News Flash

बायकोसाठी अॅमेझॉनवरून मागवला आयफोन -७, पण निघाला…..

बायकोला धक्काच बसला

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर राजीव यांनी तातडीनं पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली. (प्रातिनिधिक छायाचित्र)

आपल्या पत्नीला सरप्राईज देण्यासाठी गुरूग्राममधील एका व्यक्तीनं अॅमेझॉन या इ-कॉमर्स साईटवरून आयफोन ७ मागवला होता. यासाठी त्याने ऑनलाईन पैसेही भरले होते, पण जेव्हा त्याच्या पत्नीने बॉक्स उघडून पाहिला तेव्हा मात्र तिला धक्काच बसला. कारण, त्यात आयफोन नसून साबणाची वडी होती. या व्यक्तीनं याची तातडीने पोलिसात तक्रार केल्यानंतर त्याला त्याचे पैसे परत मिळाले.

‘गाढव’पणा! पोलिसांनी चक्क गाढवांना तुरुंगात धाडलं

राजीव जुल्का असं या व्यक्तीचं नाव असून पत्नीला भेट देण्यासाठी त्यांनी २४ नोव्हेंबर रोजी अॅमेझॉनवरून ४४,९०० रूपये किंमतीचा आयफोन-७ मागवला होता. यासाठी त्यांनी ऑनलाइन पैसेही भरले होते जेव्हा फोनची डिलिव्हरी घेऊन डिलिव्हरी बॉय घरी आला त्यावेळी बॉक्समध्ये राजीव यांना फोनच्या जागी साबणाची वडी आढळली. मात्र, बॉक्समध्ये आयफोनचा चार्जर, हेड फोन्स आणि इतर अॅक्सेसरीज तशाच होत्या.

Viral Video : पोलिसांनी नाट्यमयरित्या तिला ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर राजीव यांनी तातडीनं पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली. पोलिसांनी मोबाईलची डिलिव्हरी करण्यात आलेल्या डिलिव्हरी बॉयची चौकशी केली आहे. तसेच कंपनीनेही राजीव यांचे सगळे पैसे परत केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 12:51 pm

Web Title: man brought online iphone from amazon but get soap
Next Stories
1 Viral Video : पोलिसांनी नाट्यमयरित्या तिला ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं
2 ‘गाढव’पणा! पोलिसांनी चक्क गाढवांना तुरुंगात धाडलं
3 ‘त्या’ दिवशी काम करायला लावल्याने इस्रायली नेत्याने दिला राजीनामा 
Just Now!
X