News Flash

“काही महिन्यात बदलणार ‘हा’ लोगो”; Scotch Brite च्या Marketing Head ने ‘त्या’ पोस्टला दिलं उत्तर

या पोस्टवरुन सध्या दोघांचेही होत आहे कौतुक

Photo : LinkedIn/Karthik Srinivasan

सोशल मिडियामुळे आज कंपन्यांना आणि ग्राहकांना थेट संवाद साधणे सहज सोप्प झालं आहे. सध्या अशाच एका संवादाची सोशल मिडियावर चर्चा आहे आणि तो संवाद आहे स्क्रॉच ब्राईट या ब्रॅण्डेड घासणीसंदर्भातील. एक ग्राहक आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमधील हा संवाद म्हणजे दोघांनाही समजून घेतलं तर कशाप्रकारे सकारात्मक बदल घडू शकतो याचे उत्तर उदाहरण आहे असं म्हणता येईल.

कम्युनिकेशन स्ट्रॅटर्जी कन्सल्टंट असलेल्या कार्तिक श्रीनिवासन यांनी लिंक्डइनवर काही दिवसांपूर्वी स्क्रॉच ब्राइटच्या लोगोसंदर्भात एक पोस्ट केली होती. यामध्ये स्त्री-पुरुष समानता न दाखवता कंपनीने कशाप्रकारे लोगो बनवला आहे यासंदर्भात भाष्य करण्यात आलं होतं. या पोस्टला लगेचच स्क्रॉच ब्राइटचे मार्केटींग हेड असणाऱ्या अतुल माथूर यांनी रिप्लाय दिला. एमथ्री या स्क्रॉच ब्राइटच्या मुख्य कंपनीचे अधिकारी असणाऱ्या अतुल यांचा रिप्लाय सध्या चर्चेत आहे.

नक्की वाचा >> पत्र पोहचवण्यासाठी रोज १५ किमी पायपीट करणारा पोस्टमन ३० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त

“पुष्पांजली बॅनर्जी यांनी नुकताच मला हा फोटो पाठवला. यामध्ये स्क्रॉच ब्राइटचे पाकीट दिसत आहे. त्यांनी हा फोटो पाठवताता उपस्थित केलेला मुद्दा मला पटला. या पाकीटावरील कंपनीच्या लोगोमध्ये टीकली लावलेल्या माहिलेची व्हेक्टर इमेज (चित्र) लोगो म्हणून वापरण्यात आलं आहे,” असं श्रीनिवास यांनी म्हटलं होतं. कंपनीच्या बाकी प्रोडक्टवर हा लोगो दिसून येत असल्याचंही श्रीनिवास यांनी पोस्टमध्ये नमूद केलं होतं. “लिंट रोलरवर (कपड्यावरुन फिरवण्याचा ब्रशसारखा रोलर) हा लोगो दिसून येत नाही. स्क्रबर पॅड, सिंक ब्रश, झाडू, बाथरुम विपर, स्टेनलेस स्टील स्कब्र, टॉयलेट ब्रशवर हा लोगो दिसतो,” असं श्रीनिवास यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. “२०२० मध्ये हे असं पहायला विचित्र वाटतं. थ्री एममधील लोकं याची दखल घेतली आणि लोगो बदलतील अशी अपेक्षा आहे,” असं श्रीनिवास यांनी म्हटलं होतं. यामधून श्रीनिवास यांना किचनमधील साफसफाईची कामं महिलांनीच करायची का असं कंपनीला दर्शवायचं असल्यासंदर्भात सूचित करायंच होतं असं दिसून येतं.


श्रीनिवास यांच्या या पोस्टवर चर्चा सुरु झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या मताशी सहमती दर्शवली. त्यानंतर अतुल यांनाही श्रीनिवास यांच्या पोस्टवर कमेंट केली. “तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. ही व्हेक्टर इमेज ही जुनी आहे आणि आता काळ खूप पुढे गेला आहे. ही जुनी विचारसरणी आहे. याचाच अंदाज घेत आम्ही लोकांच्या वागणूकीमधील बदल सध्या जाहिरातींमधूनही दाखवू लागलो आहे,” असं म्हणत अतुल यांनी स्क्रॉच ब्राइटच्या जाहिरातीची लिंक पोस्ट केली आहे. यामध्ये कंपनीने ‘घर सबका तो काम सबका’ कॅम्पेनअंतर्गत घरातील सापसफाईचे काम सर्वांनी केलं पाहिजे असं सांगितलं होतं.

“सध्या आम्ही या ब्रॅण्डची व्हेक्टर इमेज बदलण्यासंदर्भातील काम सुरु केलं आहे. पुढील काही महिन्यांमध्ये हा लोगो बदललेला दिसेल हे सांगताना मला आनंद होत आहे,” असं अतुल यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.

या पोस्टवरुन लिंक्डइनवर अनेकांनी दोघांचेही कौतुक केलं आहे. श्रीनिवास यांनी मुद्दा मांडल्याबद्दल तर अतुल यांनी कंपनीची भूमिका समोर ठेवल्याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 3:48 pm

Web Title: man calls out scotch brite for gender marker in logo company s marketing head replies scsg 91
Next Stories
1 फोटोतील कोणता झेब्रा पुढे आणि कोणता मागे?; सारं जग शोधतंय उत्तर
2 Viral Video : पाचव्या मजल्यावरून खाली पडला दोन वर्षाचा मुलगा, त्यानंतर …
3 समु्द्रात होणारे भूकंप, त्सुनामीचा अंदाज केबलच्या मदतीने व्यक्त करता येईल?; गुगलचे अधिकारी म्हणतात…
Just Now!
X