News Flash

Viral Video : तो आला, सापाला पकडून लुंगीत टाकलं आणि ….

दक्षिणेतील एखाद्या चित्रपटात शोभेल असं दृश्य

येथे काहीही होऊ शकते!

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी अनेक व्हिडिओ एवढे भन्नाट असतात की, विचारायची सोय नाही. आता हाच व्हिडिओ पाहा ना! तो पाहिला तर तुम्हाला दक्षिणेकडेच्या एखाद्या सिनेमातलं दृश्य सुरु आहे की काय असंच वाटेल. हा व्हिडिओ २०१६ मधला असून साधारण वर्षभरानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

वाचा : फेकून देऊ नका, कारण खूप उपयोगी आहे ‘ही’ छोटीशी पुडी

शर्ट आणि लुंगी परिधान केलेल्या एका सर्पमित्राने काठीच्या साह्याने सापाला पकडले. त्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. त्याने अगदी सहजतेने सापाला शेपटीला पकडून हवेत उचलले. आता सापला पकडल्यानंतर सर्पमित्र त्यांना एका पिशवीत ठेवतात आणि मग जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून देतात. पण या सर्पमित्राने मात्र सापाला पिशवीत न ठेवता चक्क आपल्या लुंगीत ठेवलं. त्याने इतक्या सहजतेने सापाला आपल्या लुंगीत लपवलं की, सगळेच पाहत बसले. हा एकूणच प्रसंग दक्षिणेतील एखाद्या चित्रपटात शोभेल असा होता. मात्र, हा व्हिडिओ पाहून पुन्हा एकदा अनेकांचे मनोरंजन झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2017 6:06 pm

Web Title: man catches snake puts in his lungi walks away
Next Stories
1 स्मार्टफोन, कॉम्प्युटर क्लिनिंगसाठी हे अॅप वापरताय? सावधान!
2 सापाच्या पिलाला तू का रे खवळीलं…बर्थडे पार्टीत सापाशी खेळणं महागात पडलं
3 अनेक जण मला पुरुष म्हणून हिणवायचे; टेनिस सम्राज्ञी सेरेनाचे आईला भावनिक पत्र
Just Now!
X