08 March 2021

News Flash

सौदीतील पतीचा वर्तमानपत्रातील जाहिरातीद्वारे हैदराबादमधील पत्नीला तलाक

पोलिसांकडून पतीविरोधात तक्रार दाखल

प्रातिनिधीक छायाचित्र

हैदराबादमधील एका अनिवासी भारतीयाने वर्तमानपत्रात जाहीर देऊन पत्नीला तलाक दिला आहे. या व्यक्तीविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा आणि छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एका २५ वर्षीय महिलेने मोहम्मद मुस्ताकुद्दीनच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जानेवारी २०१५ मध्ये मोहम्मद मुस्ताकुद्दीन निकाह त्याच्या पत्नीला अरेबियाला घेऊन गेला. मागील महिन्यात मुस्ताकुद्दीन पत्नी आणि १० महिन्याच्या मुलासह भारतात परतला. यानंतर मुस्ताकुद्दीन पुन्हा कामासाठी सौदी अरेबियाला निघून गेला. याप्रकरणी मुस्ताकुद्दीनच्या पत्नीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. एका स्थानिक उर्दू वर्तमानपत्रात जाहिरात देऊन मुस्ताकुद्दीनने तलाक दिल्याची तक्रार महिलेने केली आहे. तलाक देण्याआधी २० लाखांच्या हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याची तक्रार पीडित महिलेने केल्याची माहिती पोलीस उपायुक्त एस. गंगाधर यांनी दिली आहे.

मुस्ताकुद्दीन सौदी अरेबियाला परत गेल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी पीडित महिलेला घरात प्रवेश करण्यास मज्जाव केला. दोन दिवसांपूर्वीच पीडित महिलेने वर्तमानपत्रात तिच्या पतीकडून देण्यात आलेली तलाकची जाहिरात पाहिली. ही जाहिरात पतीच्या वकिलाने दिली होती. या जाहिरातीत मुस्ताकुद्दीन महिलेला तलाक देत असल्याचा मजकूर होता.

‘पीडित महिलेने अनेकदा मुस्ताकुद्दीनला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने एकही फोन उचलला नाही. यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली,’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी मुस्ताकुद्दीन विरोधात कलम ४९८ (अ), कलम ४२० आणि कलम ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 4:53 pm

Web Title: man charged for divorcing wife through newspaper advertisement
Next Stories
1 ट्विटर लाइट लाँच, होणार ७०% मोबाईल डाटाची बचत
2 व्हायरल होतेय २०० रुपयांची नोट
3 युपीच्या जंगलात सापडली ‘मोगली’
Just Now!
X