आफ्रिकेमधील मलवाई देशामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका पुरुषाचा सेक्स करतानाच मृत्यू झालाय. या व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालामध्ये शरीरसंबंध ठेवताना ही व्यक्ती अती उत्साहीत झाल्याचे म्हटले आहे. या व्यक्तीचा मृत्यू समागमाच्या वेळी शिगेस पोहचलेली उत्कटतेमुळे म्हणजेच एक्सट्रीम ऑरगॅझममुळे झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे. एका  शरीरविक्रय करणाऱ्या महिलेसोबत सेक्स करत असतानाच या व्यक्तीचा मृत्यू झालाय.

नक्की वाचा >> PPE सूट फाडून नर्सने करोना रुग्णासोबत केला सेक्स

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मरण पावलेल्या ३५ वर्षीय व्यक्तींचे नाव चार्लस माजवा असं आहे. शरीरविक्रय करणाऱ्या महिलेसोबत शरीरसंबंध ठेवत असतानाच चार्लस बेशुद्ध पडला आणि काही काळानंतर त्याचा मृत्यू झाला. मिगोवी शहरामध्ये ही घटना घडल्याचे ‘डेली स्टार’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या व्यक्तीची शुद्ध हरपल्यानंतर महिला घाबरली आणि तिने आपल्या मैत्रिणीला यासंदर्भात कळवलं. त्यानंतर या महिलेने पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलीस आरोग्य पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. या शवविच्छेदन अहवालामध्ये एक्सट्रीम ऑरगॅझममुळे या व्यक्तीच्या मेंदूमधील नसा फुटल्याचे नमूद करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> पोप फ्रान्सिस म्हणतात, “चांगलं खाणं आणि सेक्स…”

शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांनी या घडलेल्या घटनेसाठी संबंधित महिलेला दोषी ठरवता येणार नाही असं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात कोणाविरोधातही खटला चालवला जाणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. चार्लसचा मृतदेह त्याच्या मुळगावी म्हणजेच मातेप्वी येथे नेण्यात आला असून तेथेच त्याच्यावर अंतिमसंस्कार करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. नयसा टाइम्स या स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सेक्स करताना अती उत्तेजित झाल्याने चार्लसचा मृत्यू झाला आहे.

नक्की वाचा >> पोलिसांनी छापा मारला तेव्हा घरात ५० जण करत होते  Sex Party

ही घटना जेथे घडली त्या फालोम्बी पोलिसांचे अधिकृत प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार्लसने एका शरीरविक्रय करणाऱ्या महिलेसोबत वेळ घालवण्यासाठी रुम बूक केला होता. मात्र शरीरसंबंध ठेवतानाच तो बेशुद्ध पडला. सध्या देशामध्ये या प्रकऱणाची चांगलीच चर्चा असून अनेकांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर सोशल मिडियावर यासंदर्भात काही मिम्सही व्हायरल केले जात आहे.

नक्की वाचा >> १००० गर्लफ्रेण्ड्स असणाऱ्या मुस्लीम धर्मगुरुला १०७५ वर्षांचा तुरुंगवास