News Flash

त्यांनी अवघ्या १० हजार रुपयांमध्ये केलेलं लग्न ठरतयं चर्चेचा विषय

सध्या या विवाहसोहळ्याची सोशल मिडियावर चर्चा आहे

रिझवान

लग्न म्हटल्यावर खर्च आलाच. या वर्षी तर अनेक बड्या कलाकारांची लग्न झाली आहेत त्यामुळे शाही लग्न आणि त्यासाठी येणारा खर्च हा या वर्षी चर्चेचा विषय ठरला. बडे सेलिब्रिटी वगळता सामान्यांबद्दल बोलायचे झाले तर लग्न म्हटल्यावर काही लाखांचा खर्च तर होतोच. मात्र असा इतरांप्रमाणे लग्नाचा खर्चिक मार्ग टाळत पाकिस्तानमधील एका तरुणाने अवघ्या २० हजारांमध्ये विवाह केला. सध्या या विवाहसोहळ्याची सोशल नेटवर्किंगवर चांगलीच चर्चा आहे.

पाकिस्तानमधील रिझवान नावाच्या तरुणाने आपले लग्न २० हजार पाकिस्तानी रुपयांमध्ये (म्हणजे १० हजार भारतीय रुपये) केले आहे. विशेष म्हणजे इतक्या कमी पैशांमध्ये लग्न कसे केले याबद्दल त्यानेच ट्विट्स करुन माहिती दिली आहे. या ट्विट्समध्ये त्याने आपल्या लग्नाला ‘अपनी मर्जी की शादी’ म्हटले आहे. चला तर पाहुयात कशाप्रकारे त्याने अवघ्या दहा हजार रुपयांमध्ये हे लग्न केले.

माझ्या लग्नाला एकूण २५ पाहुणे आले होते ज्यामध्ये मित्र आणि कुटुंबियांचाही समावेश होता. लग्नाचं ठिकाणं होतं माझ्या घराची गच्ची. मेन्यू होता चिकन टिक्का, सिख कबाबा, पाठुरे चाणे हलवा आणि स्ट्रॉब्रेरी.

मी माझ्या लग्नाचे बजेट २० हजार रुपये (पाकिस्तानी रुपये) ठेवले होते. माझ्या मित्राच्या स्वयंपाक्याने सर्व जेवण बनवले. मी बाजारातून चिकन आणि मसाले घेऊन आलो आणि त्या स्वयंपाक्याला जेवण बनवण्यासाठी मदत केली. माझ्या वडीलांनी सजावटीसाठी काही रोषणाईच्या माळा आणून त्या गच्चीवर व्यवस्थित लावल्या.

घराच्या शेजरी असणाऱ्या पक्षकार्यालयातून मी २५ खुर्च्या आणल्या. घाईघाईत मी डेझर्ट्स विसरलो तर माझ्या मित्राने घरी येताना स्ट्रॉबेरी आणि आईस्क्रीम आणले. तसेच इतर दोस्तांच्या मदतीनेच त्याच मित्राने खाण्याच्या टेबलचीही व्यवस्था केली.

माझ्या बायकोने आणि मी निळ्या रंगाचे सलवार कमिझ घातले होते. या सर्वांचे पैसे माझ्या आईने आणि बिहिणीने दिले होते. हे कपडे आमच्यासाठी गिफ्ट होते. रात्रभर आम्ही गप्पा मारल्या आणि अन्नपदार्थांचा आस्वाद घेतला.

माझा सांगायचा उद्देश एवढाच की सर्व काही आनंदाने साजरे करा. तुम्हाला ज्या पद्धतीने हवं त्या पद्धतीने आणि परवडेल असे लग्न करा. पण मज्जा करा. आनंदी राहा. लहान असो वा मोठे सर्व लग्न आनंदातच व्हायला हवीत. सर्वांनी सुखी राहा. बाय (सोबत लग्नाचा फोटो अटॅच केला आहे)

रिझवान आणि त्याच्या पत्नीने मुद्दामच छोटेखानी सोहळ्यात विवाह केला. अगदी २५ जणांच्या उपस्थितीत केलेले लग्न सध्या सोशल मिडियावर चर्चेत आले आहे. भारतामध्येही अनेकांना लग्न खर्च परवडत नाही पण तरीही अनेकजण कर्ज काढून वगैरे लग्न करतात. अशा लोकांनी रिझवानचा आदर्श समोर ठेवल्यास नक्कीच फायदा होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 5:58 pm

Web Title: man manages a lavish wedding party with just rs 10000
Next Stories
1 अन् पाकिस्तानच्या पत्रकाराने गाढवावरून केलं रिपोर्टिंग
2 शेगाव कचोरी झाली ६८ वर्षांची
3 साधेपणा… महापौर झाल्यानंतरही त्या घरोघरी जाऊन करतात दूध विक्री
Just Now!
X