‘जगा आणि जगू द्या’ हा साधा नियम आहे. आपण उगाच कोणाला त्रास देण्याच्या भानगडीत पडायचंच नाही, कारण वाईट कर्माची शिक्षा कधीतरी भोगावीच लागते. नाही का? असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय.

मंदिरपरिसरातील तळ्याच्या कठड्यावर एक माकड निवांत बसलं होतं. एका तरुणानं प्रँक व्हिडिओ करण्याच्या नादात या बिचाऱ्या मुक्या जिवाला कठड्यावरून पाण्यात ढकलून दिलं. माकडाचा तोल गेल्यानंतर मज्जा पाहाण्यासाठी हा तरुण थांबला पण पुढच्याच सेकंदाला या माकाडानं स्वत:ला सावरलं आणि त्या तरुणाला अद्दल घडवण्यासाठी त्याच्यावर हल्ला केला. माकडाचा प्रतिकार पाहून या तरुणानं धूम ठोकली, इतकंच नाही तर इतरही माकड हल्ल्यासाठी यात सामिल झाले. तरुणानं अक्षरश: जीव मुठीत घेऊन पळ काढला. पिअर व्हिडिओनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा तरुण माकडांच्या हल्ल्यात जखमी झाल्याचंही समजत आहेत.