ऑनलाइन खरेदी करताना अनेकदा तुम्ही मागवलेल्या वस्तूपेक्षा भलतीच वस्तू गळ्यात पडते. कधी कधी मोबाईल, कॅमेराच्या जागी साबणाच्या वडी किंवा दगड आल्याचे वाईट अनुभवही अनेकांना येतात. या अनुभवातून रेडिओ प्रेझेंटर डायलन इव्हान्सही सुटला नाही. काही दिवसांपूर्वी त्यानं ई- कॉमर्स साईटवरून जीन्स, टी-शर्ट आणि सनग्लासेस मागावले होते. पण, काही दिवसांनी त्याच्या घरी जीन्सऐवजी लालभडक रंगाचा छानसा मुलींचा ड्रेस पोहोचला.

वाचा : सोन्याचे बूट, सोन्याची टाय नवरदेवाचा लग्नात राजेशाही थाट!

वाचा : खबरदार! फीचर्स लीक कराल तर… अॅपलची कर्मचाऱ्यांना ताकीद

जीन्सऐवजी मुलींचे कपडे पाहून वैतागलेल्या डायलननं अनोख्या पद्धतीनं या ईकॉर्मसची तक्रार केली आहे. त्यानं पार्सलमध्ये आलेला गाऊन परिधान केला आणि त्याचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला. ‘मी चुकीचा असू शकतो, पण मी ठामपणे सांगू शकतो की तुम्ही मला चुकीचे कपडे पाठवले आहेत.’ डायलनं केलेलं ट्विट आणि उपरोधिकपणे त्यानं वेबसाइटवर केलेली टीका सगळ्यांना आवडली. डायलननं जरी वेबसाईटची तक्रार करण्यासाठी हा ड्रेस परिधान केला असला तरी अनेकांनी हा मुलींचा ड्रेस तुझ्यावर खूप छान दिसतो त्यामुळे तूच तो ठेवून घे असा सल्ला त्याला दिलाय. त्याचं हे ट्विट आतापर्यंत ५४ हजार लोकांनी रिट्विट केलंय.