लैला-मंजनू….हीर-रांझा यासारखी उदाहरणं तुम्ही अनेक ऐकली असतील. असेच एक प्रेमाचं उदाहरण समोर आले आहे. करोना व्हायरस या महामारीनं पत्नीचा बळी घेतल्यानंतर पतीनेही जगाचा निरोप घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. इंग्लंडच्या साउथहँपटनमधील ही प्यार वाली स्टोरी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

इंग्लंडमधील साउथॅम्पटन येथील ९० वर्षीय बिल डार्टनल यांनी पत्नीच्या निधनानंतर स्वत:ला लावलेला ऑक्सिजन मास्कही काढला. त्यानंतर पुढच्या पाच तासात त्यांचाही मृत्यू झाला. बिल डार्टन यांच्या ८१ वर्षीय मेरी यांना गेल्या आठवड्यात करोनाचा संसर्ग झाला. त्यांना जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पत्नीला रूग्णालयात दाखल केल्यानंतर बिल यांचीही प्रकृती अचानक खराब झाली अन् त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल कखण्यात आले.

(Photo Credit : Solent News )

दोघेही पती-पत्नी एकाच रूग्णलायत मृत्यूशी झूंज देत होते. अखेर मेरी यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूचा बिल डार्टनल यांना मोठा धक्का बसला. पत्नीच्या मृत्यूच्या बातमीने बिल डार्टनल यांनी ऑक्सिजन मास्क काढला. तेव्हा त्यांच्या मुलींनी मास्क लावण्याचा प्रयत्न केला पण बिल यांनी ऐकलं नाही. मुलींनी सांगितलं की, त्यांनी स्पष्टपणे ऑक्सिजन लावणार नाही असं म्हटलं. ते आईशिवाय राहू शकत नव्हते. शेवटी झोपेतच त्यांचा मृत्यू झाला.