15 October 2019

News Flash

Video : डोनाल्ड ट्रम्प यांचा मुखवटा घालून त्यानं केली चोरी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुखवटा घालून एका चोरानं चक्क दुकान लुटलं आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुखवटा घालून ऑस्ट्रेलियातील एका चोरानं चक्क दुकान लुटलं आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी या प्रकाराचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला असून चोराला ओळखण्यास मदत करण्याचे आवाहन लोकांना केलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीनं चोरी करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मास्क घातला होता. त्यानं काळ्या रंगाची ट्रॅक पँट आणि पांढरे बूट घातले होते. रविवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास चोरानं शॉपिंग सेंटमध्ये चोरी केली. त्यानं शॉपिंग सेंटरच्या काचा फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यानं अनेक घड्याळं चोरली. इतकंच नव्हे, तर विजेच्या दुकानाची काचही त्यानं फोडली. काही सामान चोरी करून तो पसार झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

या घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं मुखवचा घालून चोरी करणार तो आरोप कोण, याचा पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, यापूर्वी इटालीमधील दोन भावांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुखवटा घालून २० एटीएम यंत्रांची चोरी केली होती. त्यांनी एकूण दहा हजार युरोंची चोरी केली होती.

First Published on May 8, 2019 3:40 pm

Web Title: man robs shoping center wearing donald trum mask in austrelia