गोठलेल्या पाण्यात मरणाशी झुंज देत अडकून पडलेल्या असलेल्या एका वृद्ध महिलेला जीवाची पर्वा न करता वाचवण्याचं धाडस चीनमधल्या हेबै प्रांतातल्या तरुणानं केलं. या महिलेला गोठलेल्या नदीतून बाहेर काढतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

५४ वर्षांच्या शी ली यांना नदीत पडलेली एक महिला दिसली. त्यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता शी ली यांनी नदीकडे धाव घेत हातानंच गोठलेला बर्फ फोडण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीमुळे नदीत पडलेली ही वृद्ध महिला पूर्णपणे गारठून गेली होती. बराच वेळ पाण्यात राहिल्यानंतर तिचं शरीर पूर्णपणे गोठून गेलं होतं. तिला हालचाल करणंही अशक्य होतं. आणखी काही काळ ती पाण्यात राहिली असती तर तिच्या जीव नक्कीच धोक्यात आला असता पण, शी लीनं तिला मोठ्या कष्टानं पाण्यातून बाहेर काढलं आणि तिचे प्राण वाचवले.