News Flash

हिटलरपासून ६६९ ज्यू मुलांना वाचवणारा देवदूत

सर निकोलस विंटनना या सर्वांनी दिलं सरप्राईज्

छाया सौजन्य: डेली मेल

दुसरं महायुध्द म्हणजे जगाच्या इतिहासातलं एक काळं पान. यात कोट्यवधी सैनिकांची कत्तल तर झालीच. पण 60 लाख निष्पाप नागरिकांचेही बळी गेले. हे काही युध्दातल्या चकमकीत सापडून ठार झालेले नागरिक नव्हते. तर या सगळ्यांची धरपकड करत त्यांना छळछावणीत गॅस चेंबर्समध्ये कोंडून ठार मारण्यात आलं. हिटलरच्या ज्यूद्वेषाची ही परिसीमा होती. जसजसं हिटलरचं सैन्य युरोप खंड पादाक्रांत करत गेलं तसतशी त्या त्या प्रदेशांमधल्या ज्यू लोकांची छावण्यांमध्ये रवानगी व्हायला लागली.

दुसऱ्या महायुध्दाच्या काळात निरपराधांची कत्तल करणारे हिटलर सारखे नराधम होते तसे सर निकोलस विंटनसारखे देवदूतही होते.

चेकोस्लोवाकियावर जर्मनी हल्ला करणार आणि तिथल्या ज्यूंचा संहार होणार हे स्पष्ट दिसत असताना सर निकोलस यांनी 669 ज्यू मुलामुलींची चेकोस्लोवाकियातून सुटका करत त्यांना ब्रिटनमध्ये नेलं. एका खऱ्या नायकाप्रमाणे त्यांनी आपल्या या कामगिरीची कोणाहीकडे, अगदी आपल्या बायकोकडेही वाच्यता केली नाही. महायुध्दानंतर इतक्या वर्षांनी घराची साफसफाई करत असताना त्यांच्या एका डायरीत त्यांच्या बायकोला त्यांच्या या कामगिरीविषयी समजलं. महायुध्द संपल्यावर आपापल्या आयुष्यात स्थिरस्थावर झालेल्या या मुलांशी तिने संपर्क साधला आणि या सर्वांनी मिळून सर निकोलस यांना एक सरप्राईझ दिलं. एका कार्यक्रमाच्या वेळी ही सगळी मुलं सर निकोलस यांच्या आसपास बसली. ही माणसं कोण आहेत याचा निकोलस यांना पत्ता नव्हता. काही वेळाने हे सगळेजण त्यांच्याभोवती उभे राहिले. आणि मानवतेच्या या देवदूताच्या डोळ्यात अश्रू तरळले.

सौजन्य- यूट्यूब

लंडनमध्ये जन्म झालेले सर निकोलस पुढे लंडनच्या शेअर बाजारात स्टाॅक ब्रोकर म्हणून काम करू लागले होते. पण त्यांची विचारसरणी काहीशी डाव्या बाजूकडे झुकलेली होती. दुसऱ्या महायुध्दाच्या सुरूवातीला सर निकोलस चेकोस्लोव्हाकियामध्ये ब्रिटिश सरकारच्या एका समितीला मदत करायला होते. त्यावेळी हिटलरच्या सैन्यापासून ज्यू मुलांचा बचाव करण्यासाठी त्यांना ब्रिटनमध्ये नेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पण हाॅलंडने आपल्या प्रदेशातून या मुलांना न्यायला बंदी घातल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावेळी तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलणं करत या ६६९ मुलांना ट्रेनने हाॅलंडमधून पुढे नेण्यात सर विंटन यांनी यश मिळवलं. पुढे या मुलांचं इंग्लंडमध्ये पुनर्वसन करण्यासाठीही त्यांनी मोठी कामगिरी बजावली.

वाचा- नव्या को-या गाडीचा काही मिनिटात चुराडा

या सगळ्या प्रकाराची त्यांनी कोणाकडेही वाच्यता न करता कुठल्याही प्रकारचा मोठेपणा आपल्याकडे घेतला नाही. निकोलसनी केलेलं मानवतेच्या दृष्टीने केलेलं हे प्रचंड मोठं काम प्रकाशात आल्यावर ब्रिटवनच्या राणीने त्यांचा ‘सर’ पदवी देत गौरव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 3:07 pm

Web Title: man saves 669 children from world war holocaust gets a surprise decades after
Next Stories
1 बिहारमधल्या शेकडो मुलांच्या रहस्यमयी मृत्यूला ‘लिची’ कारणीभूत?
2 नव्या को-या गाडीचा काही मिनिटात चुराडा
3 गावकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून ३० वर्षांपासून धडपडतय विदेशी दाम्पत्य
Just Now!
X