News Flash

Viral Video : झोपेतच पॅण्टमध्ये घुसला कोब्रा घुसला ; भीतीमुळे सात तास एकाच जागी राहिला उभा

उत्तर प्रदेशमधील घटना ठरतेय चर्चेचा विषय

झोपेत असणाऱ्या व्यक्तीच्या कपड्यांमध्ये साप शिरल्याची बातम्या याआधीही तुम्ही नक्कीच वाचल्या असतील. मात्र उत्तर प्रदेशमध्ये झोपेत असतानाच कपड्यांमध्ये साप शिरल्याने एका व्यक्तीला चक्क सात तास खांबाला पकडून उभं रहावं लागल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही २९ जुलैच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत असून या व्यक्तीचा एक व्हिडिओही सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २८ जुलैच्या रात्री उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरमधील एका व्यक्तीच्या कपड्यांमध्ये कोब्रा घुसला. साप थेट कपड्यांमध्ये घुसल्याने हलचाल केल्यास तो आपल्याला दंश करेल अशी भिती असल्याने या व्यक्तीने रात्रभर एकाच जागी उभं राहण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी गारुड्याला बोलवण्यात आलं. त्याच्या मदतीने या नागाला बाहेर काढण्यात यश आलं. ही घटना सिकंदरपूर गावामध्ये घडल्याचे सांगण्यात येत आहे.

नक्की पाहा >> Viral Video : काही फूटांवरुन ‘उडत आला’ रिक्षाचालक आणि…

सिकंदरपूरमध्ये विजेचे खांब उभारण्याचे काम सुरु आहे. दिवसभराचे काम झाल्यानंतर सर्व कामगार रात्रीचे जेवण करुन झोपी गेले. याच कामगारांपैकी एक असणाऱ्या लव्हकेश कुमारला मध्यरात्री जाग आली. त्यावेळी लव्हकेशला त्याच्या कपड्यांमध्ये साप शिरल्याचे जाणवले. त्यानंतर तो जागेवर उभा राहिला. जवळच असणाऱ्या पिलरला पकडून तो उभा राहिला. त्याच्या काही सहकाऱ्यांनी सकाळी कपडे कापून गारुड्याच्या मदतीने साप बाहेर काढला. पिलर पकडून उभा असणाऱ्या लव्हकेशचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नक्की पाहा >> Viral Video : चार नाही सात हत्ती आहेत या व्हिडिओत; तुम्हाला सापडतायत का पाहा बरं

हा व्हिडिओ वेगवेगळ्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यापैकी सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओला २० हजारहून अधिक व्ह्यूज आहेत. अनेकांनी लव्हकेशवर ओढावलेल्या या संकटावर प्रतिक्रिया देताना अंगावर काटा असल्याचे म्हटले आहे तर काहींनी एवढा वेळा उभं राहण्याऐवजी काय करता आलं असतं याबद्दलचे मत नोंदवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 2:01 pm

Web Title: man stands for a whole night after realising that a snake had entered his pants while he was asleep scsg 91
Next Stories
1 मर्दानी… अन् तरुणीनं शेपटीने ओढत शार्कला असं वाचवलं, व्हिडीओ व्हायरल
2 महात्मा गांधींना इंग्रजांची अनोखी मानवंदना; तुम्हालाही वाटेल अभिमान
3 Viral Video : जन्मल्यानंतर हत्तीच्या पिल्लाने असं काही केलं की पाहणाऱ्यांना हसू थांबेनासं झालं
Just Now!
X