आपण केलेल्या कामाची शबासकी मिळालेलं कोणाला आवडत नाही. त्यातही ऑफिसमध्ये एम्प्लॉयी ऑफ द मंथ वगैरे सारखा पुरस्कार मिळाल्यानंतर चारचौघात कॉलर अजून टाइट होते. मात्र एका व्यक्तीला हा पुरस्कार मिळ्यानंतर त्याची इंटरनेटवर चांगलीच चर्चा आहे. आता तुम्ही म्हणाल की एम्प्लॉयी ऑफ द मंथ मिळाल्यावर इंटरनेटवर अगदी व्हायर होण्याइतकी चर्चा व्हायचे काय कारण असा पुरस्कार तर अनेक कंपन्यांमध्ये अनेकांना मिळतो. अर्थात हे अगदी खरं असलं तरी इथं प्रकरण थोडं वेगळं आहे. कारण या व्यक्तीला मिळालेल्या ‘एप्लॉय ऑफ द मंथ’ची पोलखोल त्याच्या सख्या बहिणीनेच केली आहे.

झालं असं की अमेरिकेमधील टेनेसी येथील एका कंपनीत काम करणाऱ्या जॉनथन नावाच्या तरुणाला एम्प्लॉयी ऑफ द मंथ मिळाल्याचे कंपनीच्या पेजवर पोस्ट करण्यात आले. जॉनथनचे अभिनंदन त्याला या महिन्यातील सर्वोत्तम कर्मचारी हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्काराचा भाग म्हणून त्याला कंपनीने अलास्काची सहल भेट देण्यात आल्याचे कंपनीने या पोस्टमध्ये नमूद केले होते. या पोस्टवर जॉनथनने कंपनीचे आभार मानले आणि चांगला बॉस मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

आता इथपर्यंत सर्व काही ठीकं होतं. पण अचानक जॉनथच्या बहिण मॅण्डी वॉर्गिंटन हिने ट्विटरवर एक पोस्ट करत तिच्या भावाला मिळालेल्या पुरस्काराची पोलखोल केली. तिने कंपनीच्या पेजवरुन पोस्ट करण्यात आलेल्या फोटो आणि त्यावर भावाने दिलेल्या प्रतिक्रियेचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत या पुरस्कारामागील कहाणी सांगितली. ‘हे माझ्या भावाचंच फेसबुक पेज आहे. तो स्वत: या कंपनीचा मालक आहे. तो स्वत:च बॉस आहे. आणि कंपनीत तो स्वत: एकटाच कर्मचारी आहे,’ असं तिने ट्विटमध्ये सांगितलं.

बहिणीनेच पोलखोल केल्यानंतर जॉनथनच्या या स्वकौतुकावर नेटकरी फिदा झाले आहेत. अनेकांनी जॉनथच्या या कल्पनेचे कौतुक केले आहे तर काहींनी त्याच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे असं मत व्यक्त केलं आहे. पाहुयात काय म्हणालेत नेटकरी…

मला का नाही सुचलं

मी पण लवकरच…

पुढच्या महिन्यातही होऊन जाऊ द्या…

पुरस्कार सोहळा…

आयुष्य असचं जगलं पाहिजे…

माझ्या बॉसला म्हणजे मलाच मी हे दाखवायला हवं

भारीच

…म्हणजे कंपनीतल्या सगळ्यांना एकत्रच सुट्टी

कंपनीच्या टीम मिटिंग्स

माझे बाबा नेहमी असं करायचे

स्वत:वर एवढं प्रेम करा की

मॅण्डीने केलेले हे ट्विट चार दिवसांमध्ये ५० हजारहून अधिक जणांनी रिट्विट केले असून २ लाख ६८ हजारहून अधिक जणांनी लाइक केले आहे.