करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन घेण्यात आलाय. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना घरी राहण्याचे आवाहन केले जात आहे. याचा प्रेमीयुगुलांना चांगलाच फटका बसल्याचे दिसून येत आहे. मात्र, असे असताना देखील प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. असाच एक प्रकार समोर आला आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी एका तरूणाने चक्क १३०० किमीची पायपीट केली आहे. अहमदाबाद ते बनारसपर्यंत प्रेमासाठी तरूण पायी चालत गेला.

द लल्लनटॉप या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, एका मिस्ड कॉलमुळे दोघांच्या प्रेम कहाणीला सुरूवात झाली. दोघांनाही भेटयचं होतं मात्र लॉकडाउनमुळे शक्य होत नव्हते. तरूणाने पायी जाण्याचा निर्णय घेतला. अहमदाबाद येथून बनारासपर्यंत असा १३०० किमीचा प्रवास त्यानं पायी केला.

१२ मे मंगळवारी मिर्जा मुराद पोलीस स्थानकात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली. पोलिस यंत्रणा तात्कळ कामाला लागली. पोलिसांनी मुलीचा मोबाइल स्ट्रेस केला अन् तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. तिथे गेल्यानंतर त्यांना प्रेमाचा मॅटर समजला. मुलगी स्वत:च्या मर्जीने प्रियकराला भेटण्यासाठी गेल्याचे पोलिस आधइकारी सुनील दत्त यांनी सांगितले.

त्यानंतर दोघांचीही रितसर चौकशी करून सोडण्यात आलं. चौकशीदरम्यान मुलीनं सांगितले की, मुलगा मुळचा बनारसमधीलच आहे. पण कामामुळे तो बनारसला गेला होता. पाच महिन्यापूर्वी एका मिस्ड कॉलच्या माध्यमातून दोघांचीही ओळख झाली. काही दिवस सतत बोलणं झाल्यानंतर भेटण्याचा केला. इतक्यात लॉकडाउन सुरू झालं. दोघांनाही भेटायचं होतं पण कोणतीही सुविधा नसल्यामुळे मुलगा पायी निघाला. अखेर दोघेही भेटले. पण त्याचवेळी पोलिस तेथे पोहचले. पोलिसांनी प्रेमीयुगीलाची विचारपूस केल्यावर त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. दोघेही वयस्क आहेत. तरूणाला पोलिसांनी सोडून दिलं तर तरूणीला तिच्या परिवाराकडे पाठवण्यात आलंय.