29 November 2020

News Flash

शेवटी नशीब ! लॉकडाउन काळात नोकरी गमावलेल्या व्यक्तीला कोट्यवधींची लॉटरी

परिवाराला सुखद धक्का

सध्या संपूर्ण जग करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करत आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी जगभरातील बहुतांश देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे अर्थव्यवस्थेवरही मोठा ताण पडत आहे. अनेक लोकांना या काळात आपल्या नोकऱ्या गमवाल्या लागल्या आहेत. मात्र न्यूझीलंडमधील एका व्यक्तीला या खडतर काळात सुखद अनुभव आला आहे. लॉकडाउनमुळे नोकरी गमावलेल्या हॅमिल्टन शहरातील एका व्यक्तीला 10.3 million (New Zealand Dallers) ची लॉटरी लागली आहे. (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे ४७.७ कोटी रुपये)

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउन काळात नोकरी गमावल्यानंतर सदर व्यक्ती घरातच होता. या व्यक्तीची पत्नी ही वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे तिला कामासाठी बाहेर पडावं लागतं. “मी घरी आले तेव्हा माझा नवरा किचनमध्ये एका टेबलवर बसला होता. एका जागेवर पाकीट ठेवलं होतं, आणि त्याकडे पाहून तो थोडा विचीत्र वागत होता. त्याने मला ते पाकीट उघडायला सांगितलं. ज्यात वर्तमानपत्राच्या बातमीचं कात्रण होतं, ज्यामध्ये हॅमिल्टनमधील एका व्यक्तीने लॉटरी जिंकल्याची बातमी होती. हे तू मला का दाखवत आहेस असं विचारल्यानंतर नवऱ्याने आपणच ती लॉटरी जिंकल्याचं मला सांगितलं.”

“सुरुवातीला मला यावर विश्वास बसला नाही आणि नवरा माझी मस्करी करतोय असं वाटलं. पण त्याने मला लॉटरीवाल्यांकडून आलेला इ-मेल दाखवला. यानंतर खात्री करण्यासाठी मी माझ्या लॉटरी तिकीटावरुन वेबसाईटवर लॉगइन केलं आणि पाहिल्यावर ती लॉटरी आम्हीच जिंकलेलो आहोत याची मला खात्री पटली.” पत्नीने स्थानिक प्रसारमाध्यमांना माहिती दिली. इतक्या मोठ्या रकमेचं इनाम जिंकल्यानंतरही या परिवाराने आपल्याला सामान्य लोकांसारखं आयुष्य जगायला आवडेल असं सांगितलं. घरातले काही खर्च, गाडीची डागडुजी आणि मुलांच्या शिक्षणासाठीची सोय केल्यानंतर उर्वरित रकमेतून इतरांना मदत करणार असल्याचं या परिवाराने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 6:26 pm

Web Title: man who lost job amid coronavirus lockdown wins rs 47 crore lottery psd 91
Next Stories
1 Video : जेव्हा आश्विन रोहितला म्हणतो, मला मराठी शिकव ना !
2 Video: बाजारात भन्नाट Sanitiser Spray; स्पायडरमॅनप्रमाणे मनगटाजवळून मारता येणार सॅनिटायझरचा फवारा
3 Viral Video : बिबट्याला पुरून उरला छोटासा बेडूक
Just Now!
X