अमेरिकेतील न्यायालयाचा धक्कादायक आणि अजब निर्णय समोर आला आहे. एका व्यक्तीने तब्बल २०८ कोटी रूपयांची लॉटरी जिंकली. इतकी मोठी रक्कम हातात आल्यानंतर त्या व्यक्तीचा आनंद द्विगुणीत झाला होता. मात्र कोर्टाच्या निर्णयामुळे त्याला १०४ कोटींचा फटका बसला आहे. न्यायालयाने लॉटरीमधील जिंकलेल्या रकमेतील अर्धी रक्कम घटस्फोटीत पत्नीला देण्याचा आदेश दिला आहे.

अमेरिकेतील मिशिगनमध्ये ही अजब घटना घडली आहे. रिच जॅलोस्को या व्यक्तीला ३० मिलियन डॉलर म्हणजेच २०८.६ कोटी रूपयांची लॉटरी लागली. लॉटरीची रक्कम पाहून अर्थातच सॅलोस्कोला आनंद झालाय पण ८ वर्षांपूर्वी दूर झालेल्या पत्नीने आनंदामध्ये विरजन टाकले.

लॅलोस्को यांची पत्नी रिचा गेल्या आठ वर्षांपासून वेगळे झाले आहेत. पण स्थानिक कोर्टाने आदेश दिला आहे की, त्याने जिंकलेल्या रकमेतील अर्धी रक्कम घटस्फोटीत पत्नीला द्यावी. कारण त्याने हे तिकीट २०१३ मध्ये खरेदी केलं होतं. २०११ पासूनच त्याची पत्नी त्याची पत्नी वेगळी राहत होती. पण त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला नव्हता.