मित्राची गाडी किंवा दुचाकी ‘थोडा वेळ दे ना लगेच परत आणून देतो’ असं सांगून आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी मदत घेतली असणार. खरं तर अशावेळी मदतीच्या वेळी धावून येतो तोच खरा मित्र ही म्हण आठवते. मात्र याच मित्राने तुमची गाडी एखाद्या ठिकाणी ठोकली. आणि त्यातही ती गाडी चक्क २ कोटींची असली तरी तुमची प्रतिक्रिया काय असेल? पडलात ना गोंधळात. पण खरोखरच असा प्रकार स्पेनमध्ये घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ ९ ऑगस्ट रोजी युट्यूबवर पोस्ट करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> मस्करीची कुस्करी… YouTube Prank करणाऱ्या दोन जुळ्या भावांना अटक; होऊ शकतो चार वर्षांचा तुरुंगवास

युट्यूबवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये हरिकेन परफॉर्मेन्टे ही लॅम्बॉर्गिनी कंपनीची गाडी भिंतीला धडकल्याचे दिसत आहे. या गाडीचा पुढील अर्ध्याहून अधिक भाग हा भिंतीच्या आत घुसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या अपघातानंतर घटनास्थळावरुन चालक पळून गेला होता. मात्र पोलिसांनी तपास केला असता तो जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याचे समजले. व्हिडिओमध्ये दिसणारी हिरव्या रंगाच्या गाडीची किंमत २ लाख ८१ हजार ५४२ डॉलर म्हणजेच अंदाजे २ कोटी रुपये इतकी आहे. ही गाडी स्पेनमधील एका विद्यृत पुरवठा करणाऱ्या सबस्टेशनला धडकल्याचे लॅड बायबल या वेबसाईटने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.  हा अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी चालकाची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर नियमांचा भंग केल्याप्रकरणी चौकशीसाठी डिस्चार्ज मिळाल्यावर पोलीस स्थानकामध्ये हजर होण्यास सांगण्यात आलं.

पोलीस स्थानकामध्ये चौकशी केली असता ही गाडी ज्याच्याकडून अपघात झाला त्याच्या मलकीची नसल्याची माहिती समोर आली. म्हणजेच अपघातानंतर काही दिवसांनी या गाडीचा मालक आणि ती चालवणारा दोन वेगळ्या व्यक्ती असल्याचे पोलिसांच्या लक्षात आलं. अपघातानंतर चालक आणि त्याच्याबरोबरच्या अन्य एका मित्रावर जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असलं तरी गाडीचा मालक अपघात झाला तेव्हा गाडीमध्ये नव्हता. आपल्या मित्राला गाडी चालवायला देणं या व्यक्तीला चांगलच महागात पडलं. इतकचं नाही केवळ या तिघांना या गोष्टीचा फटका तर बसलाच शिवाय गाडी अपघाताच्या ठिकाणावरुन म्हणजेच विद्यृत केंद्रापासून बाहेर काढण्यासाठी या परिसरातील विद्यृत पुरवठा काही काळ खंडित करावा लागल्याने स्थानिकांनाही या अपघाताच्या झळा सोसाव्या लागल्या.

नक्की  पाहा >> Viral Video : शिकार करण्यासाठी बिबट्याने थेट दरीमध्ये मारली उडी अन्…

या प्रकरणामध्ये आता पोलीस पुढील चौकशी करत असून गाडीचा अपघात झाला त्यावेळी गाडी चालवणाऱ्याविरोधात रॅश ड्रायव्हिंग आणि वाहतूकीचे नियम मोडल्याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.