काही साप विषारी असतात. त्यांच्याशी खेळ खेळणं कधी कधी जीवावरही बेतू शकतं, हे माहिती असतानाही काहीजण अतिसाहस करायला जातात. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सापाला विनाकारण त्रास देणारी व्यक्ती थोडक्यात बचावल्याचे दिसत आहे.

विक्टर प्रॅट हा व्यक्ती रॅटल स्नेक जातीच्या सापांना पकडून त्यांच्यासोबत खेळायचा. हा खेळ कधीतरी अंगलगट येऊ शकतो, याची कल्पना असतानाही त्याने हे उद्योग थांबवले नाहीत. आपल्या मुलाच्या वाढदिवसादिवशी विषारी सापांना हातात घेऊन तो स्टंट करत होता. आपण लहान मुलांना स्टंट करून दाखवले तर मुलं खूश होतील. त्यांच्यावर आपली छाप पडेल असं विक्टरला वाटलं, म्हणूनच त्याने मुलांनासमोर स्टंट करायला सुरूवात केली. मुलंही खूश होऊन त्याचे स्टंट पाहत होती. काहीजण कॅमेरात फोटो त्याचे काढण्यातही मग्न होते.

वाचा : चोरांना उपरती, २ दिवसांनी चोरीचा माल परत करत घरमालकालाच दिला लाखमोलाचा सल्ला

या नादात विक्टरची सापावरची पकड सुटली आणि सापाने त्यांच्या डोक्याला दंश केला. विक्टर विषबाधा झाल्याने खाली कोसळला. सुदैवाने सर्पदंश झाल्यानंतर काही मिनिटांतच त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे त्याचे प्राण वाचले.

वाचा : मद्यधुंद तरुणांनी अभिनेत्रीला भररस्त्यात काढायला लावल्या उठाबशा