पाणीपुरी, गोलगप्पा, पुचका.. नावं जरी वेगवेगळी असली तरी पाणीपुरी म्हणजे आपल्या भारतीयांचं ‘ऑल टाईम फेव्हरेट’ चाट! तिखट, गोड, आंबट, चटपटीत चवीची पाणीपुरी पाहिली की तोंडाला पाणी सुटतं. पण कधी-कधी पाणीपुरी खूपच आवडत असली तरी ती ज्या प्रकारे तयार केली जाते हे पाहून खाण्याची इच्छाच मरते. पाणीपुरीच्या ठेल्यावर अनेकदा स्वच्छतेचा पत्ता तर नसतोच! ती व्यक्ती अस्वच्छ हातानेच पाणीपुरी ग्राहाकांना देत असते. इच्छा झाली तरी ठेल्यावरील किळसवाणा प्रकार पाहून फुकट दिली तरी नको, असं वाटतं. पण आता यावर मणिपाल तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मार्ग शोधून काढलाय. त्यांना एक भन्नाट पद्धत सूचली आहे. या विद्यापीठाच्या इंजीनिअर विद्यार्थ्यांनी पाणीपुरी डिस्पेन्सर मशिन तयार केलंय. त्यामुळे विक्रेत्याला ग्राहकांना पाणीपुरी सर्व्ह करताना स्वच्छतेची काळजी घेता येणार आहे.

वाचा : अजब गजब! ‘या’ सणाला पुरलेल्या प्रेतांना बाहेर काढतात

या पाणीपुरी डिस्पेन्सरमुळे सुखा पुरीमध्ये ऑटोमॅटीक पाणी आणि सारण भरलं जाईल. त्यामुळे पुरीच्या पाण्यात हात बुडवून ती सर्व्ह करण्याचा किसळवाणा प्रकार टाळता येईल. त्यामुळे लवकरच ग्राहकांना हायजिनिक पाणीपुरी खाता येणार आहे. फक्त या डिस्पेन्सरमध्ये सारण भरण्यासाठी एका व्यक्तीची आवश्यकता असणार आहे. एखाद्या व्यक्तीने किती पाणीपुरी फस्त केल्यात याचाही हिशेब हे मशीन ठेवणार आहे.

वाचा : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टीकेचे धनी, एका हातात नात दुसऱ्या हातात बिअर ग्लास