26 November 2020

News Flash

पूरग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या IAS अधिकाऱ्याच्या जिद्दीला सलाम!

अनेकजण आपला जीव धोक्यात घालून पूरग्रस्ताची मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी हा फोटो ट्विट केला आहे.

नागरिकांना मदत करण्याची त्यांची सुरू असलेली धडपड नक्कीच कौतुकास पात्र होती.

ईशान्येकडील राज्यांना पुराचा जोरदार तडाखा बसला आहे. मुसळधार पाऊस, वादळ, भूस्खलन अशा कित्येक नैसर्गिक संकटांचा सामना लोक करत आहेत. पूरामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारनं मदत जाहीर केली आहे. अनेकजण आपला जीव धोक्यात घालून पूरग्रस्ताची मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. अशातच इंफाळमधला एक फोटो मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केला आहे. हा फोटो मणिपूरचे आयएएस अधिकारी दिलीप सिंग यांचा आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ते जीव धोक्यात घालून पाण्यात उभे होते. कंबरेपर्यंत साचलेल्या पाण्यात उभं राहून मानवी साखळी तयार करून ते पूरग्रस्तांची मदत करत होते.
नागरिकांना मदत करण्याची त्यांची सुरू असलेली धडपड नक्कीच कौतुकास पात्र होती. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते बमन इराणी यांनीही ट्विट करून दिलीप सिंग यांचं कौतुक केलं आहे. देशाची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या अशा लोकांना पाहून नेहमीच आनंद होतो. दिलीप सिंग यांच्या जिद्दीला सलाम असं ट्विट करत बमन इराणी यांनी त्यांचा फोटोही ट्विट केला आहे.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी ट्विट करत दिलीप सिंग यांचं कौतुक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2018 6:02 pm

Web Title: manipur ias officer hailed as hero for leading the flood
Next Stories
1 ऐकावं ते नवल! यांना कडाक्याच्या थंडीत फुटतो घाम, तर उन्हाळ्यात वाजते थंडी
2 उत्तुंग इमारतीवर चढला तरी कसा? पाहा इटुकल्या प्राण्याची आभाळाएवढी हिंमत
3 सर्चमध्ये गँगस्टरशी तुलना झाल्याने केली तक्रार; गुगलला दिड लाख दंड
Just Now!
X