25 November 2020

News Flash

टॅटूचं ‘जतन’ करायला पाठ विकली!!

हा 'कलाप्रकार' 'या' पध्दतीने जतन होणार!!

'कलाप्रकार' जतन होणार (छाया सौजन्य: विम डेल्व्हाॅय)

कलेला कशाचंच बंधन नसतं. ‘मोनालिसा’, ‘मॅडोना अाॅन द राॅक्स’ अशा आणि यासारख्या जगप्रसिध्द चित्रांबाबत आपण एेकलेलं असतंच. ही चित्र जागतिक कलेचा वारसा म्हणून जतन केली जातात. इटलीमधला ‘कलता मनोरा’ही कलत जात पडून जाऊ नये म्हणून त्याचं गेल्या शतकात धावपळ करत जतन करण्यात आलं. हा मनोरा अजून कलतच असला तरी त्याचा कलण्याचा वेग आता कमी झाला आहे.
चित्रं, शिल्पं,वास्तू यांचं जतन करणं शक्य असलं तरी एखाद्याच्या शऱीरावर काढलेल्या टॅटूचं एक कलाप्रकार म्हणून त्या माणसाच्या निधनानंतरही कायमस्वरूपी जतन करणं शक्य आहे का? कल्पना विचित्र वाटते पण असंच काही टिम स्टायनर या माणसाविषयी झालंय.
विम डेल्व्हाॅय या प्रसिध्द बेल्जियन कलाकाराचा टॅटू आपल्या पाठीवर काढून घेण्यासाठी टिम पुढे आला होता. मेक्सिकन पध्दतीचा हा टॅटू टिमच्या पाठीवर काढायला दोन दिवस लागले होते. या सगळ्या प्रकारामुळे या टॅटूला प्रचंड प्रसिध्दी मिळाली आणि कलेचं एक उत्तम उदाहरण म्हणून या टॅटूला मान्यता मिळाली. या टॅटूचं ‘प्रदर्शन’ करण्यासाठी टिम स्टायनरला जगभरातून निमंत्रणं यायला लागली. जगातल्या अनेक महत्त्वाच्या कलाप्रदर्शनांमध्ये शर्ट काढून आपल्या पाठीवरचा टॅटू दाखवणं या कामासाठी त्याला प्रचंड मानधन मिळू लागलं.
आणि आता हा ‘कलाप्रकार’ टिमच्या मृत्यूनंतरही ‘अजरामर’ व्हावा यासाठी त्याच्या पाठीच्या त्वचेचं जतन होणार आहे. २००८ साली टिमने आपल्या पाठीवरचा हा टॅटू एका धनाढ्य जर्मन कलारसिकाला ‘पाठीसकट’ विकला.
जाम विचित्र कल्पना आहे ही! विचार करा, टिमच्या मृत्यूनंतर त्याच्या पाठीवरचा हा टॅटू ‘काढला’ जाईल, जतन केला जाईल, आणि जगभर ‘फ्रेम’ करून दाखवला जाईल. त्याबद्दल टिम जिवंत असेपर्यंत त्याला प्रचंड मानधनही मिळणार आहे.

 वाचा- ३५ हजारात ‘मारुती ८००’ चे रुपडे पालटले
एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याचं शरीर किंवा शरिराचा भाग जतन करण्याचा हा प्रकार किळसवाणा वाटत असला तरी याआधी याप्रकारची अनेक उदाहरणं झाली आहेत. पार इजिप्शियन काळातल्या ‘ममींपासून’ ते विसाव्या शतकात रशियन क्रांतिकारी व्लादिमीर लेनिनच्या जतन केलेलं शरीर असो. अशी उदाहरणं अनेक आहेत. जपानमधल्या टॅटूच्या पंरपरेमध्येही अशा पध्दतीचे प्रयोग केले गेले आहेत.

वाचा- दिल्ली पोलीस ‘ऑन ड्युटी चोवीस तास’..; मध्यरात्री महिलेची अशी केली मदत
पण आपल्यासमोरचा ‘कलाप्रकार’ हा कोणा जिवंत माणसाच्या शरिराचा एक भाग आहे, ही कल्पना जगभरातल्या ‘रसिकांना’ किती रूचेल हे आताच सांगता येणं अवघड आहे. पण आताच्या आधुनिक काळात, चलो ये भी सही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 2:43 pm

Web Title: mans skin to be preserved to perpetuate tattoo art
Next Stories
1 ३५ हजारात ‘मारुती ८००’ चे रुपडे पालटले
2 २२ वर्षांपासून सांडपाण्याच्या पाइपलाइनमध्ये थाटला संसार!
3 ओळखलंत का सर मला?
Just Now!
X