News Flash

आग्रा विद्यापीठातून ‘सलमान खान’ झाला ३५% मिळवून बीए

विद्यापीठाचा सावळा गोंधळ

गुणपत्रिका तयार करण्याचे काम ज्या खासजी संस्थेला देण्यात आले होते त्यांनीही हा गोंधळ घातल्याचा आरोप विद्यापीठानं केला

आग्रा विद्यापीठाकडून विद्यार्थ्याला देण्यात आलेल्या गुणपत्रिकेत चक्क बॉलीवूडचा ‘भाईजान’ सलमान खान याचा फोटो लावल्याचा हास्यास्पद प्रकार समोर आला आहे. गुणपत्रिकेत विद्यार्थ्याचे नाव होते पण त्याजागी फोटो मात्र सलमान खानचा होता, विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप करण्यापूर्वी जेव्हा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी गुणपत्रिका तपासल्या तेव्हा हा प्रकार उजेडात आला आहे.

१८ हजार प्रेक्षकांसमोर तोल घसरून पडलेल्या मॉडेलनं पाहा पुढे काय केलं

ही गुणपत्रिका ‘अमरता सिंग मेमोरिअल डिग्री कॉलेज’च्या विद्यार्थ्यांची असून त्याचंही आडनाव खान असल्याचं समजतं. हा बीएचा विद्यार्थी असून त्याला ३५ टक्के गुण मिळाले आहेत. एकंदरच विद्यापीठाचा सावळा गोंधळ समोर आल्यानंतर विद्यापीठाने गुणपत्रिका परत मागवली.
गुणपत्रिका तयार करण्याचे काम ज्या खासजी संस्थेला देण्यात आले होते त्यांनी हा गोंधळ घातल्याचा आरोप विद्यापीठानं केला असल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान सलमान खानचा फोटो असलेल्या गुणपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं आग्रा विद्यापीठाची मात्र चांगलीच नाचक्की झाली आहे.

Viral Video : श्रीलंकेच्या बॅट्समनचा हा शॉट पाहून तुम्हीही डोक्यावर हात माराल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 4:38 pm

Web Title: marksheet issued by the agra university for a ba student had the photo of bollywood star salman khan
Next Stories
1 Viral Video : अंगावरून ट्रेन जाऊनही ‘तो’ सुखरूप बचावला
2 Viral Video : श्रीलंकेच्या बॅट्समनचा हा शॉट पाहून तुम्हीही डोक्यावर हात माराल
3 Viral Video : पाणीपुरीही खातानाचा कुत्र्याचा हा व्हिडिओ पाहिलात?
Just Now!
X