लग्नासाठी वधू हवी आहे… अशा मथळ्या खालील जाहिराती तुम्ही अनेकदा पहिल्या असतील. अनेकदा या जाहिरांतीमध्ये वधू ही उंच, सडपातळ बांधण्याची आणि रंगाने गोरी हवी आहे असं नमूद केलेलं असतं. आता हळूहळू मॅट्रीमोनियल साईटच्या समान्यामध्ये अशा जाहिरातींचे प्रमाण पुर्वीपेक्षा कमी झालं आहे. मात्र या जाहिराती आजही छापून येतात हे ही तितकच खरं. या जाहिरातींची संख्या कमी होण्याबरोबरच त्यांचा मायनाही बदलेला आहे. सोशल नेटवर्किंगवर अशाच एका जाहिरातीच चर्चा सुरु आहे. या जहिरातीमध्ये हव्या असणाऱ्या वधूला सोशल नेटवर्किंगचे व्यसन नसावे असं नमूद करण्यात आल्याने नेटकऱ्यांमध्ये या जाहिरातीची चर्चा रंगलीय.

आयएएस अधिकारी असणाऱ्या नितिन सांगवान यांनी ट्विटरवरुन या जाहिरातीचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे जाहिरात देणाऱ्याने स्वत:ची ओळख सोशल मीडियाचे व्यसन नसणारा पेशाने वकील आणि संशोधक अशी करुन दिली आहे. या जाहिरातीमध्ये आपल्याकडे हाऊस कार असल्याचे जाहिरात देणाऱ्याने म्हटले आहे. आमच्या काहीही मागण्या नाहीयत असं या जाहिरातीत लिहिलं असून हुंडा घेणार नाही असं यामधून सुचित करायचं आहे. जाहिरातीमध्ये मुलगी ही सुंदर, रंगाने गोरी, उंच आणि सडपातळ बांधण्याची हवी असं म्हटलं आहे. जाहिरातीची शेवटची ओळ ज्यावरुन सध्या चर्चा सुरु आहे ती, ‘वधूला सोशल मीडियाचं व्यसन नसावं’ अशी आहे.

या ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. पाहुयात काही निवडक प्रतिक्रिया…

एवढ्या मागण्यांमुळेच वयाच्या ३७ व्या वर्षी…

सगळ्याच पोरींना नकार मग

पण हल्ली लग्न सोशल नेटवर्किंगवर जुळतात…

मॉलमध्ये शॉपिंगला आलाय का?

वेगळ्याच युगात जगतोय

खूपच अपेक्षा

विरोधाभास म्हणजे…


या आधी अशाप्रकारच्या ९५ हून अधिक कमेंट या ट्विटवर आहेत. तर एक हजार १०० हून अधिक जणांनी हे ट्विट लाईक केलं आहे. तुम्हाला या मागण्या वाचून नक्की काय वाटलं हे कमेंट करुन कळवा.