17 October 2019

News Flash

‘दानिशला त्याचे साडेचार लाख सबस्क्रायबरही देवाच्या कोपापासून वाचवू शकले नाही’

'दारु पिणारा दानिश मरतो तेव्हा आमच्या मुलीही त्याचे फोटो मोबाइलवर ठेवताना दिसतात'

मोहम्मद सिद्दकी रिझवी आणि दानिश झेन

नवी मुंबईमध्ये काही आठवड्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातामध्ये लोकप्रिय युट्युब स्टार एमटीव्हीवरील ‘ऐस ऑफ स्पेस’चा स्पर्धक दानिश झेनचा मृत्यू झाला. मात्र दानिशच्या मृत्यूसंदर्भात आता एका मौलवींने वादग्रस्त वक्तव्य केलं असून या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. जेव्हा एखादी चांगल्या व्यक्तीचे निधन होते त्यावेळी मुस्लिम समाजातील तरुणांना त्याचे काहीच वाटत नाही तर दुसरीकडे एखादा नाचणारा, गाणारा आणि दारु पिणारा तरुण मरतो तेव्हा आमची मुलंच नाही मुलीही त्याचे फोटो मोबाइलवर ठेवताना दिसतात असं वक्तव्य या मौलवींनी केले आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मोहम्मद सिद्दकी रिझवी या मैलवींनी दानिशच्या राहणीमानावर प्रश्न उपस्थित केले आहे. ‘काहीजण म्हणतात त्याच्या युट्यूब चॅनेलला साडेचार लाख सबस्क्रायबर होते. मात्र खऱ्या आयुष्यात तो त्याच्या पालकांबरोबर नाही तर त्याच्या प्रेयसीबरोबर राहत होता. जेव्हा कार अपघातात त्याचा मृत्यू झाला त्यावेळी त्याचा चेहराही ओळखू येत नव्हता. तसेच तेथे उपस्थित असणाऱ्या एकाने मला दिलेल्या माहितीनुसार जेव्हा त्याला दफन करण्यासाठी कब्रिस्तानमध्ये नेण्यात आले त्यावेळी त्याच्या अंगावरील टॅटू आधी जाळण्यात यावेत आणि मग त्याला दफन करण्यात यावे अशी चर्चा तेथे झाली,’ असं या व्हिडीओमध्ये हे मौलवी बोलताना दिसत आहेत.

तसंच पुढे बोलताना या मौलवींनी दानिशचे साडेचार लाख सबक्रायबर त्याला देवाच्या कोपापासून वाचवू शकले नसल्याचे मतही मांडले. ‘त्याचे साडेचार लाख सबक्रायबर त्याला देवाच्या कोपापासून वाचवू शकले का?’ असा सवाल उपस्थित करत गुगल मॅप्सवरून तुम्हाला रस्ते आणि गल्ल्यां असलेले नकाशे दिसतात मात्र त्यावर स्वर्गाकडे जाणारा रस्ता दिसत नाही असंही या मौलवींने व्हिडीओत सांगितले आहे.

२० डिसेंबर रोजी नवी मुंबई येथे डॅनिशच्या होंडा सिटी गाडीचा भीषण अपघात झाला. एका लग्नावरून घरी जात असताना झालेल्या अपघातामध्ये डॅनिशचा मृत्यू झाला.

First Published on January 9, 2019 4:54 pm

Web Title: maulvi ridicules youtuber danish zehens death