News Flash

अरररर! बुमराहची पत्नी संजनाऐवजी संजय बांगरला दिल्या शुभेच्छा, मयंक अग्रवालकडून झाला घोळ

संजनाला शुभेच्छा देताना चुकून मयंकने चक्क माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांना दिल्या शुभेच्छा !

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सोमवारी स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला. बुमराहने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी दोघांना शुभेच्छा दिल्या, पण या दरम्यान क्रिकेटपटू मयंक अग्रवालकडून एक मोठी गफलत झाली. त्यामुळे मयंकला नेटकऱ्यांच्या जबरदस्त ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.

मयंक अग्रवालने ट्विटरद्वारे बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशनला शुभेच्छा दिल्या. पण, संजनाला शुभेच्छा देताना चुकून मयंकने चक्क माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांना टॅग केलं. त्याने संजनाऐवजी संजय बांगर आणि जसप्रीत बुमराह यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. चुकून संजय बांगर यांना टॅग केल्यामुळे, ‘अभिनंदन जसप्रीत बुमराह आणि संजय बांगर. तुमचं वैवाहिक आयुष्य आनंदी आणि आरोग्यदायी राहो’, असा त्याच्या ट्विटचा अर्थ निघाला. त्यावरुन नेटकऱ्यांनी मजा घ्यायला सुरूवात केली.

 


चूक लक्षात आल्यावर मयंकने आपलं ट्विट लगेच डीलिट केलं आणि नवीन ट्विट करत संजना आणि बुमराहला शुभेच्छा दिल्या. पण, तोपर्यंत अनेकांनी त्याच्या जुन्या ट्विटचा स्क्रीनशॉट घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 8:58 am

Web Title: mayank agarwal makes a blunder while wishing jasprit bumrah and sanjana ganesan on their wedding wishes sanjay bangar insteaf sanjana sas 89
Next Stories
1 Video : पाकिस्तानात प्रेमाची शिक्षा! तरुणीने कॉलेज कॅम्पसमध्ये ‘त्याला’ खुलेआम केलं प्रपोज अन्…
2 धक्कादायक! लग्नामधील फोटोशूटसाठी सिंहाच्या पिल्लाला दिले ड्रग्ज
3 video : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती; थरारक घटना सीसीटीव्ही कैद
Just Now!
X