22 February 2020

News Flash

पतीला ट्रोल करणाऱ्याला मयंती लँगरचे बोल्ड उत्तर, म्हणाली…

मयंतीच्या फोटोवरुन स्टुअर्ट बिन्नीला ट्रोल करण्याचा प्रयत्न एकाने केला अन्...

मयंती लँगर

क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या समालोचकांपैकी एक चेहरा म्हणजे मयंती लँगर. मागील अनेक वर्षांपासून क्रिकेट जगतामधील दिग्गजांबरोबर क्रिकेटसंदर्भातील टॉक शोमध्ये झळकणारी मयंती आज जगभरात लोकप्रिय झाली आहे. पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या क्रिकेट समालोचनासारख्या श्रेत्रामध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रीयांमध्ये मयंतीचे नाव घेतले जाते. मयंती समालोचनाबरोबरच सोशल नेटवर्किंगवरही चांगलीच अॅक्टीव्ह आहे.

अनेक वर्षांपासून समालोचन करणाऱ्या मयंतीला क्रिकेटमधील अनेक बारकावे ठाऊक आहेत. ती तिच्या संवाद कौशल्याने आणि क्रिकेटबद्दलच्या ज्ञानामुळे अनेकदा कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांबरोबरच प्रेक्षकांचीही मने जिंकून घेते. असं असतानाही अनेकदा तिला सोशल नेटवर्किंगवर नको त्या कारणावरुन टार्गेट केलं जातं. नुकतचं असंच काहीसं घडलं. मात्र यावेळी मयंतीने तिला ट्रोल करणाऱ्याला जशास तसं उत्तर दिलं.

नक्की काय घडलं?

झालं असं की काही दिवसांपूर्वी मयंतीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर स्टुडीओमधील फोटो पोस्ट केला. “आमच्या स्टुडियोमधील आयुष्य किती रंगीत आहे पाहा,” असं मयंतीने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं होतं. या फोटोमध्ये मयंती जांभळ्या रंगाचं ब्लेझर आणि काळ्या पांढऱ्या रंगाच्या वनपीसमध्ये दिसत आहे. तसेच स्टुडियोमधील रंगीत डेकोरेशनही या फोटोमध्ये दिसत आहे.

मयंतीच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी अनेक चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तीचे कपडे, हास्य यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मात्र एका फॉलोअरने “सध्या स्टुअर्ट बिन्नी काय करतोय?”, असा सवाल विचारला आहे.

या कमेंटवर दुसऱ्या एका फॉलोअरने “तो सध्या तिला बँगा उचलायला मदत करतो,” अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

मयंतीचे उत्तर

सामान्यपणे अशा ट्रोलर्सकडे सेलिब्रिटी दूर्लक्ष करतात. मात्र मयंतीने या कमेंटवर तितकीच भन्नाट प्रतिक्रिया दिली. “मी माझ्या स्वत:च्या बँगा नेऊ शकते. धन्यवाद! तो (स्टुअर्ट बिन्नी) सध्या त्याचे आयुष्य जगत आहे, क्रिकेट खेळत आहे. तो मस्त मजेत आहेत. आणि हो तो अनोळखी लोकांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत नाही हे ही महत्वाचं आहे,” असं ट्विट मयंतीने केलं आहे. या ट्विटमधून तिने स्टुअर्ट तिच्या बँगा उचलतो म्हणणाऱ्याला थेट टोला लगावला आहे.

मयंती आणि स्टुर्टचे २०१२ साली लग्न झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून मयंती समालोचक म्हणून काम करते. तर सध्या भारतीय संघात सुरु असलेल्या चढाओढीमुळे स्टुर्टला मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र तो घरगुती स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत आहे.

First Published on February 10, 2020 1:43 pm

Web Title: mayanti langer gave a fitting reply to a troll who said stuart binny is carrying her baggage scsg 91
Next Stories
1 Fact Check: चीनने खरंच २० हजार कोरोना रुग्णांना ठार मारण्याची परवानगी मागितली आहे का ?
2 अरे हे काय! एकाच दिशेने धावत फलंदाजांनी काढल्या चार धावा
3 …अन् कुत्र्याने गिळली चक्क डायमंड रिंग, डॉक्टरांनी लढवली शक्कल