अगदी हुबेहुब ‘बाहुली’सारखी दिसणारी एंजेलिका केनेवा ही २६ वर्षांची रशियन मॉडेल सोशल मीडियावरची ‘सुपरस्टार’ आहे. तिला मिळालेल्या ‘ह्युमन बार्बी’ या नावामुळे ती सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरली आहे . जगभर या ‘बाहुली’चे कोट्यवधी चाहते आहेत. तिचे फोटो पहिल्यावर समजतच नाही की, ती बाहुली आहे की जिवंत व्यक्ती? याच कारणामुळे तिच्याबद्दल जाणून घेण्यात अनेकांना उत्सुकता असते.

Viral Video : संगीतसोहळ्यातील नववधूचा परफॉर्मन्स पाहून नवरदेवाला झाले ‘लव्ह अॅट सेकंड साइट’

एंजेलिका केनेवाही प्रसिद्ध असली तरी प्रसिद्धी मात्र तिला पुरेपुर अनुभवता येत नाही, कारण तिचे आई-वडील तिला कधीच एकटीला घराबाहेर सोडत नाही. फोटोशूटव्यतिरिक्त आपण घराबाहेर कधीच पाऊल टाकलं नसल्याचं तिने ‘डेली मेल’या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कबुल केलं आहे. एंजेलिका लहान असल्यापासून बाहुलीसारखी ‘गोड’दिसायची, म्हणून आई-वडिलांनीदेखील तिची बाहुलीप्रमाणे वेशभूषा ठेवायला सुरूवात केली. त्यावेळी नुकतीच ‘बार्बी डॉल’ची क्रेझ जगभरात सुरूवात झाली होती. एंजेलिकाची आई तिला बार्बीसारखे कपडे घालून बाहेर नेत असे, सगळ्यांना या छोट्या बाहुलीचे फारच कौतुक वाटायला लागले. ‘तुमची मुलगी बाहुलीसारखी गोड दिसते’ असं म्हणत अनेकांनी एंजेलिकाचं कौतुक केलं. एंजेलिका मोठी झाली पण तिचे आई- वडील मात्र त्या जगातून बाहेर आलेच नाही. ती मोठी झाल्यावरही आई वडिलांनी तिला बाहुलीप्रमाणे वाढवायला सुरूवात केली.

कर्मचाऱ्यांचे धूम्रपान रोखण्यासाठी कंपनीने दिली ‘ही’ ऑफर

जन्मत: लाभलेल्या सौंदर्यामुळे ती मोठी झाल्यावर परिकथेतल्या परीसारखीच दिसू लागली. तिला आई वडिलांच्या परवानगीशिवाय घराबाहेर पडण्यास, लोकांमध्ये मिसळण्याची अनुमती नाही. आईवडिलांच्या या अतिरेकी वागण्यामुळे अनेकदा त्यांच्यावर टिकाही केली जाते पण एंजेलिकाला मात्र लोकांचे आरोप मान्य नाही. माझ्या काळजीपोटी ते मला घरातून बाहेर सोडत नाही असं तिचं म्हणणं आहे.