News Flash

मॅकडोनल्डमधल्या ९४ वर्षांच्या तरुण आजीबाई

म्हातारी असले म्हणून काय झाले?

मॅकडोनल्डमधल्या ९४ वर्षांच्या तरुण आजीबाई
गेल्या ४४ वर्षांपासून मॅकडोनल्डमध्ये काम करत आहेत

सुरकुतलेला चेहरा, डोळ्यांवर चष्मा, डोक्यावर मॅकडोनल्डची कॅप, टीशर्ट घालून या ९४ वर्षांच्या आजी प्रत्येकांची आपुलकीने चौकशी करतात, ग्राहकांची अचूक ऑर्डर घेतात आणि त्यांना हवी तशी न्याहरी झटपट बनवूनही देतात. इतर तरुण कर्मचारी ज्या उत्साहात आणि जोमात काम करतात त्याच उत्साहात त्या काम करतात. गेल्या ४४ वर्षांपासून मॅकडोनल्डच्या सेवेत रुजू असलेल्या या आजींचा मॅकडोनल्डकडून सत्कार करण्यात आला.

वाचा : या ग्लॅमरस आजीला पाहिलंत का?

या वयात अनेक जण आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेले असतात. आजारांमुळे अंथरुण धरलेलं असंत पण आजींनी मात्र आजारांना आपल्या जवळही फिरकू दिले नाही. त्याच जोशात उत्साहात त्या काम करतात. लॉरेन असं या आजींचं नाव. १९७३ पासून त्या काम करत आहेत. त्यांना चार मुलं, सहा नातवंडं आणि ७ पणतू देखील आहेत. पण यांच्यासोबत रमण्यापेक्षा आजी आपल्या कामातच जास्त रमतात. अनेक ग्राहक तर त्यांच्या हातची न्याहरीच खायला इथे येतात. या वयातही आपल्याला काम करण्यात खूप मज्जा येते असं  त्या अभिमानाने  सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2017 10:48 am

Web Title: meet 94 year old mcdonalds employee
Next Stories
1 सोशल मीडियावर उत्साहाची गुढी
2 Viral : टॉमेटोमध्ये चक्क स्ट्रॉबेरी
3 नऊ किलोमीटरचा बोगदा!
Just Now!
X