भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन पुढच्या काही आठवड्यांसाठी पर्यटकांसाठी खुलं झालं आहे. ५३ प्रकारची जवळपास १० लाखांहून अधिक ट्यूलिप येत्या महिन्याभरात येथे उमलणार आहे. हे नंदनवन खुलवण्यात एका व्यक्तीचा हात मोठा आहे. त्यांचं नाव आहे गुलाम रसूल. इंदिरा गांधी मेमोरिअल ट्यूलिप गार्डनचे ते मुख्य माळी आहेत. येत्या दोन वर्षांत ते निवृत्त होत आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी २००८ मध्ये टय़ूलिप गार्डन सुरू केले होते. ट्यूलिप गार्डनची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात रसूल यांचा वाटा मोठा होता. गेल्या कित्येक वर्षांपासून ते या ट्यूलिपची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेत आहेत. आपण मुख्य माळी म्हणून निवृत्त झाल्यावर या बागेचं काय होईल, माझ्या ट्यूलिपकडे कोण लक्ष देईल याची काळजी मला नेहमीच सतावते असं रसूल सांगतात. यावरूनच बागेवरचं त्यांचं जीवापाड प्रेम दिसून येतं. मी दिवसरात्र या ट्यूलिपच्या बागांचा, इतर फुलांचाच विचार करत असतो. उद्या उठून मला बागेत काय काम करायचं आहे याचा दिनक्रम मी ठरवायला सुरूवात करतो असं रसूल ‘दी विक’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

VIDEO : आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले

दोन वर्षांनी ते निवृत्त होतील. पण निवृत्त झाल्यानंतरही मला या बागेची नेहमीच आठवण येईल असंही ते भावनिक होऊन सांगतात, रसूल यांच्या दिवसाची सुरूवातच सुंदर रंगीबेरंगी फुलांनी होते. ट्यूलिपची प्रत्येक गोष्ट रसूल यांना माहिती आहे. ट्यूलिपचा जीवनकाळ चार आठवडे असतो, पण  उन्हानं ती मरुही शकतात याची जाणीव त्यांना आहे म्हणूच तळहाताच्या फोडाप्रमाणे ते या फुलांना जपतात. या गार्डनमध्ये दरवर्षी देशभरातूनच नाही तर जगभरातून लाखो पर्यटक येतात. हे पर्यटक जेव्हा ट्यूलिपचं अप्रतिम सौंदर्यपाहून भरावून जातात आणि बागेची स्तुती करतात तेव्हा आपण घेतलेल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं असंही रसूल म्हणतात.

अनेकदा एखाद्या जातीच्या किंवा विशिष्ट रंगाच्या ट्यूलिपच्या वाफांमध्ये चुकून दुसऱ्याच रंगाचं ट्यूलिप उमलतं. जोपर्यंत ट्यूलिप फुलत नाही तोपर्यंत ही बाब लक्षात येत नाही. तेव्हा असं ट्यूलिप अलगत वेगळं करणं आणि दुसऱ्या वाफ्यांत ते नेऊन लावणं हेही थोडं कठीण काम पण, गेली कित्येक वर्षे आपण यात काम करत असल्याचंही ते अभिमानानं सांगतात. २५ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत हे ट्यूलिप गार्डन पर्यटनांसाठी खुले राहणार आहे.

Chipko Movement :‘पेड कटने नही देंगे’, गोष्ट त्या काळच्या जंगल प्रेमाची!