21 November 2017

News Flash

हे आहे भारतातील सर्वात ठेंगणं जोडपं

त्यांची उंची आहे फक्त अडीच फूट

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 19, 2017 4:18 PM

(छाया सौजन्य : डेलीमेल )

या जगात प्रत्येकासाठी कोणी ना कोणी जोडीदार असतोच आणि तो आपल्या आयुष्यात आला  की अधुरं वाटणारं आयुष्य अचानक कसं पूर्ण वाटू लागतं. ३४ वर्षांच्या राजेशलाही विवाहबंधनात अडकल्यावर असंच वाटत असणार हे नक्की. इतर मुलांपेक्षा राजेश थोडा वेगळा आहे, त्यांची उंची आहे फक्त अडीच फूट. कदाचित आपल्याला  कोणीच जोडीदार मिळणार नाही याचं दु:ख  त्याला आयुष्यभर सलत होतं पण ते फार काळ टिकलं नाही. कारण जसं जगात प्रत्येकासाठी देवाने कोणी ना कोणी निर्माण केलं आहे तसंच राजेशची जीवनगाठ त्याने  आधीच स्वर्गात बांधली होती. राजेशचा  नुकताच  शेल्जाशी  विवाह पार पडला.  शेलजाही त्याच्याच एवढ्या उंचीची आहे. हिमाचल प्रदेशमध्ये या दोघांचा विवाह पार पडला. त्यामुळे या विवाहानंतर शेलजा  आणि राजेश  हे दोघंही  भारतातलं सगळ्यातं ठेंगणं जोडपं ठरलं आहे.

First Published on May 19, 2017 4:18 pm

Web Title: meet indias shortest couple rajesh and shelja