रशियातल्या एका रुग्णालयात काम करणा-या ‘आल्ल्या लेव्हूस्किना. वय ८९ वर्ष. पण आजही या रुग्णालयात दिवसाला किमान चार तरी सर्जरी त्या करतात. वयाच्या ८९ व्या वर्षी अनेक वृद्ध माणसे आरोग्याच्या वेगवेगळ्या समास्यांनी ग्रासलेले असतात पण, या आजी मात्र त्याच उमेदीने रुग्णालयात येतात आणि शस्त्रक्रिया करतात.

वाचा : ओळखलंत का सर मला?

माणसाजवळ असलेलं ज्ञान कधीच संपत नाही. जस जसे वय वाढत जाते तसा अनुभव आणखी दांडगा होत जातो. आल्ल्या यांच्याकडे पाहिले तर याची प्रचीती येईलच. १९५० पासून त्या शस्त्रक्रिया करत आहेत. आजही मॉस्कोमधल्या रुग्णालयात त्या नियमित येतात. दिवसाला ४ शस्त्रक्रिया करतात. आल्ल्याने केलेल्या शस्त्रक्रिया कधीच अपयशी झाल्या नाहीत हेही त्यांचे वैशिष्ट्ये आहे. डॉक्टर हे देवाचे दुसरे रुप असते असे अनेक जण मानतात म्हणूनच आल्ल्यांना देवाचे दुसरे रुपच मानतात. आजही आल्ल्या त्याच उमेदीने रुग्णालयात येतात. त्यांच्या हाताखाली अनेक डॉक्टर तयार झालेत. त्यांची काम करण्याची पद्धत अनेकांना आवडते. आल्ल्या यांनी लग्न केले नाही. आपल्या अपंग भाच्यासोबत त्या राहतात. सध्या कार्यरत असलेल्या त्या जगातील सगळ्यात वृद्ध सर्जन आहेत.

वाचा : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं..