News Flash

मेगनचा राजेशाही थाट ! ९० मिनिटांच्या दौऱ्यासाठी तब्बल सोळा लाखांचे कपडे

अनेकदा मेगननं शाही कुटुंबाचे नियम मोडले असे आरोप तिच्यावर करण्यात आले. मात्र यावेळी ती, तिनं परिधान केलेल्या कपडे आणि अॅक्सेसरीजच्या किंमतीमुळे चर्चेत आली आहे.

मेगन मार्कल

‘ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स’ उर्फ मेगन आणि प्रिन्स हॅरी हे आर्यलँडच्या दौऱ्यावर होते. यावेळीदेखील मेगन आपल्या पेहरावमुळे पुन्हा एकदा चर्चेत राहिली. यापूर्वी अनेकदा मेगननं शाही कुटुंबाचे नियम मोडले असे आरोप तिच्यावर करण्यात आले. मात्र यावेळी ती, तिनं परिधान केलेल्या कपडे आणि अॅक्सेसरीजच्या किंमतीमुळे चर्चेत आली आहे. ९० मिनिटांच्या दौऱ्यासाठी तिनं तब्बल १६ लाख खर्च केल्याच्या चर्चा आहेत.

पहिल्या भेटीसाठी तिनं करड्या रंगाचा बोटनेक ड्रेस परिधान केला होता. याची किंमत जवळपास १ लाख ४० हजारांच्या आसपास असल्याचं डेली मेलनं म्हटलं आहे. त्याचबरोबर तिनं घातलेल्या इअररिंग या सहा लाख आणि हातातली बॅग ही साडेतीन लाखांच्या आसपास होती असं संबधीत वृत्तपत्रानं म्हटलं आहे. त्यानंतर मेगनन ब्लॅकसूट परिधान केला होता याची किंमत भारतीय मुल्याप्रमाणे २ लाखांहून अधिक होती तर तिच्या हातात एका आलिशान ब्रँडचं क्लर्च होतं ज्याची किंमत दोन लाखांहून अधिक होती. तर बेल्टची किंमही ही चाळीस हजारांहून अधिक होती.

या ९० मिनिटांच्या दौऱ्यांसाठी मेगननं कपडे आणि अॅक्सेसरीसाठी तब्बल १६ लाख खर्च केले. रॉयल एक्सर्ट केटी निकोलच्या माहितीनुसार लग्न झाल्यापासून मेगनच्या कपड्यांवर तब्बल ६ कोटी ८७ लाख खर्च करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 12:35 pm

Web Title: meghan markle wore rs 16 lakh outfits on ireland tour
Next Stories
1 Thai Cave : ‘शेत वाहून गेलं, पण मुलं वाचली ना!’
2 Video : चोरी करण्याआधी चोराने दुकानासमोर केला डान्स
3 वयाच्या विसाव्या वर्षी झाली अब्जाधीश, मार्क झकरबर्गलाही टाकलं मागे
Just Now!
X