24 October 2020

News Flash

VIRAL VIDEO : पुतिन यांना घाबरल्या मेलानिया ट्रम्प?

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी पुतिन यांची भेट घेतली. मात्र हस्तांदोलन केल्यानंतर मेलानिया यांनी जी प्रतिक्रिया दिली ती मात्र चर्चेचा विषय ठरली आहे.

पुतिन यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर मेलानिया यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

काही दिवसांपूर्वी हेलसिंकी येथील शिखर बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली , मात्र मेलायिना ट्रम्प यांच्यामुळे सोशल मीडियावर या भेटीची आणखी जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी पुतिन यांची भेट घेतली. मात्र हस्तांदोलन केल्यानंतर मेलानिया यांनी जी प्रतिक्रिया दिली ती मात्र चर्चेचा विषय ठरली आहे.

पुतिन यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर मेलानिया यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. त्या पुरत्या घाबरलेल्या असल्यासारखं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. त्यांची ही प्रतिक्रिया छायाचित्रकारांच्या नजरेतून सुटली नसेल तर नवलच. त्यामुळे काही सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पुतिन यांचं वर्णन क्रूर अध्यक्ष म्हणून केलं जातं त्यामुळे कदाचित त्या घाबरल्या असाव्यात अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केली आहे.

मेलानिया यांनी प्रतिक्रिया देण्यामागचं कारण काहीही असो मात्र त्यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 12:58 pm

Web Title: melania trump haunted expression after meeting russian president vladimir putin
Next Stories
1 विश्वविजेत्या फ्रान्सचा पोग्बा शोधतोय ‘अच्छे दिन’, काँग्रेसने उडवली खिल्ली
2 ‘Idiot’ टाईप केल्यानंतर गुगलवर दिसतेय ‘या’ नेत्याची प्रतिमा
3 पडद्यामागे घडलेल्या ‘त्या’ एका गोष्टीमुळे मॉडेलने स्तनपान करत केला रॅम्पवॉक
Just Now!
X