News Flash

मेलानिया ट्रम्पच्या ‘त्या’ गाऊनची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

'Emilio Pucci' चा गाऊन होता

मेलानिया ट्रम्पच्या ‘त्या’ गाऊनची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल
मेलानिया यांनी पूर्ण बाह्याचा फ्लोरल प्रिंट असलेला पिवळ्या रंगाचा गाऊन घातला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी आणि अमेरिकेची फर्स्ट लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेलानिया ट्रम्प यांच्या स्टाईल स्टेटमेंट विषयी फॅशनविश्वात नेहमीच चर्चा असते. अनेकदा आपल्या आकर्षक आणि फॅशनेबल पेहरावाने त्या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. यावेळी देखील त्या आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बहुचर्चित भेट सोमवारी रात्री झाली. या भेटीदरम्यान मोदींच्या स्वागतासाठी खुद्द मेलानिया ट्रम्प देखील उपस्थित होत्या. या भेटीदरम्यान मेलानियाने घातलेल्या पिवळ्या रंगाच्या गाऊनची खूपच चर्चा पाहायला मिळाली.

Video : अरे…’मिसेस मोदी’ आल्याच नाहीत!; व्हाईट हाऊससमोरची ‘ती’ घटना झाली व्हायरल

या भेटीसाठी मेलानिया यांनी पूर्ण बाह्याचा फ्लोरल प्रिंट असलेला पिवळ्या रंगाचा गाऊन घातला होता. हा जगप्रसिद्ध ब्रँड Emilio Pucci चा गाऊन होता, ज्याची किंमत जवळपास दीड लाख रूपये असल्याचं समजत आहे. काही महिन्यांपूर्वी मेलानियाच्या टर्टलनेक ड्रेसचीही खूप चर्चा झाली होती. राष्ट्राध्यक्षांच्या शपथ विधी सोहळ्यात मेलानियाने Ralph Lauren ब्रँडचा ड्रेस परिधान केला होता. ट्रम्प यांच्या अनेक भूमिकांमुळे किंवा वक्तव्यांमुळे काही दिवसांपूर्वी मेलानियासाठी कपडे डिझाइन करण्यासाठी अनेक ब्रँडने नकारही दिला होता.

वाचा : तरूण शेतकऱ्याच्या भन्नाट कल्पनेतून आकाराला आले ‘Trump Tatya’ फेसबुक पेज!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 2:07 pm

Web Title: melania trump looked flawless in emilio pucci yellow dress
Next Stories
1 Video : अरे…’मिसेस मोदी’ आल्याच नाहीत!; व्हाईट हाऊससमोरची ‘ती’ घटना झाली व्हायरल
2 …आणि त्या तरुणाने ३० फूटांवरुन थेट उडीच मारली
3 तरूण शेतकऱ्याच्या भन्नाट कल्पनेतून आकाराला आले ‘Trump Tatya’ फेसबुक पेज!
Just Now!
X