20 January 2021

News Flash

पाकिस्तानी पत्रकाराची भारतावर स्लो-ओव्हर रेटवरुन टीका, वासिमभाई म्हणतात…हमको घंटा फरक नही पडता !

ICC कडून भारतीय खेळाडूंना दंड

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झालीच. त्यात भरीस भर म्हणून फलंदाजीतही हार्दिक पांड्या आणि शिखर धवनचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज आपली चमक दाखवू शकला नाही. त्यातच पहिला सामना प्रचंड लांबल्यामुळे भारतीय खेळाडूंवर षटकांची गती कायम न राखल्यामुळे कारवाई करण्यात आली. आयसीसीने भारतीय खेळाडूंच्या मानधनातली २० टक्के रक्कम कापून घेतली.

पहिल्या सामन्यातील टीम इंडियाच्या स्लो-ओव्हर रेटवरुन पाकिस्तानी क्रीडा पत्रकार मझर अर्शद यांनी टीका करत…वर्ल्ड सुपरलिग स्पर्धेत या नियमभंगासाठी १ गुण कापला जातो याची आठवण करुन दिली.

या ट्विटरवर अनेक नेटकऱ्यांनी मझर याला भारत २०२३ च्या विश्वचषकसाठी याआधीच पात्र ठरल्याचं सांगितलं. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये मिम स्पेशालिस्ट म्हणून नवी ओळख बनवलेल्या वासिम जाफरने आपल्या खास अंदाजात मझर अर्शदला ट्रोल केलंय. पाहा काय म्हणतोय वासिम जाफर

भारतीय संघाचा माजी कसोटीवीर आणि स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई आणि विदर्भाचं प्रतिनिधीत्व केलेल्या वासिम जाफरचा गेल्या काही दिवसांतला एक वेगळाच अंदाज समोर येत आहे. आयपीएलमध्ये जाफर पंजाबच्या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. याव्यतिरीक्त स्थानिक क्रिकेटमध्ये सध्या जाफर उत्तराखंडचा प्रशिक्षक म्हणून काम पाहतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 9:12 am

Web Title: meme specialist wasim jafar once again troll pakistani journalist for criticizing indian team psd 91
Next Stories
1 Ind vs Aus : टीम इंडियाने मालिका गमावली, विराट-लोकेश राहुलची झुंज अपयशी
2 भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका: दुसऱ्या सामन्यात पहिलीच रणनीती!
3 एल दिएगो..
Just Now!
X