नारायणी वेलीअम्मा या केरळमधल्या एका महिलेचे सोन्याचे कानातले २० वर्षांपूर्वी हरवले होते. ते २० वर्षांनी सापडल्याने तिच्या चेहऱ्यावरचं समाधान होतं. एका मनरेगासाठी काम करणाऱ्या महिला कामगारामुळे या महिलेचे सोन्याचे कानातले मिळाले. नारायणी वेलीअम्मा केरळच्या कासारगोडमधल्या एडामपोरद्दी या गावात राहते. या महिलेचे कानातले २० वर्षांपूर्वी हरवले होते. तिने खूप कष्टाने हे कानातले २० वर्षांपूर्वी घेतले होते. मात्र हे सोन्याचे कानातले हरवले.

ज्यानंतर हळहळलेल्या वेलीअम्माने हे कानातले सगळीकडे शोधले मात्र ते कानातले कुठेही सापडले नाही. अखेर वीस वर्षांनी मनरेगासाठी काम करणाऱ्या महिला कामगाराला हे कानातले सापडले जे आता वेलीअम्माला परत मिळाले आहेत. २० वर्षांपूर्वी त्यांनी हे कानातले घेतले होते ४ हजार रुपयांना. आत्ताच्या घडीला या कानातल्यांची किंमत ४० हजारांवर झाली आहे. ‘द न्यूज मिनिट’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

केरळमध्ये सुभिक्षा केरळम या प्रकल्पासाठी मनरेगाच्या महिला कामगार काम करत होत्या. बेबी नावाच्या महिलेला काम करताना एक चमकदार वस्तू आढळून आली. ही वस्तू चकाकते आहे म्हणून तिने ती चिखलातून बाहेर काढली. तेव्हा समजलं की हे सोन्याचं कानातलं आहे. तिने हे सोन्याचं कानातलं ग्राम पंचायतीत आणलं तिथे पद्मावती नावाच्या मुलीने तिच्या आईचं हरवलेलं कानातलं ओळखलं आणि त्यामुळे हे कानातलं सापडलं. वेलीअम्माने हे कानातलं आपल्याला आता मिळणारच नाही अशी स्वतःची समजूत घालून घेतली होती. मात्र तिला हे कानातलं मिळालं आणि ज्यामुळे ती प्रचंड खुष झाली. २० वर्षांपूर्वी जेव्हा कानातलं त्यांनी घेतलं होतं तेव्हा त्याची किंमत ४ हजार रुपये होती. आता या कानातल्याची किंमत ४० हजार रुपये झाली आहे.