फेसबुक, मायक्रोसॉफ्टच्या महत्त्वाकांक्षी अशा ‘मारिया’ इंटरनेट केबलचं काम नुकतंच पूर्ण झालं. अटलांटिक महासागराच्या तळाशी ६ हजार ४३७ किलोमीटर लांबीची केबल टाकण्यात आली आहे. या इंटरनेट केबलचं वैशिष्ट्य म्हणजे तिचा वेग हा फोरजीपेक्षा कैकपटीने जास्त असणार आहे.

या केबलमार्फत प्रतिसेकंद १६० टेराबाईट वेगाने डेटा ट्रान्सफर करता येणं शक्य होणार आहे. साध्या सोप्या भाषेत समजवायचं झालंच तर सेकंदाला ७ कोटींहून अधिक एचडी चित्रपट ट्रान्सफर करता येणार आहेत. साधारण तुमच्या इंटरनेटच्या वेगापेक्षा हा वेग दीड कोटींहून अधिक आहे. अमेरिका आणि युरोप खंडातील देशांमध्ये डेटाची देवाण-घेवाण करणं यामुळे सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ ट्रान्सफर करण्यासाठी याचा सर्वात जास्त उपयोग होणार आहे. २०१८ पासून ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. अमेरिकेत ९३ % आणि पश्चिम युरोपात ८३% मोबाईल धारकांच्या गरजा यामुळे भागवता येणं शक्य होणार आहे.

वाचा : एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम!

ही केबल समुद्र्याच्या तळातून जाते, अनेकदा नैसर्गिक आपत्तीमुळे संपर्क तुटतो किंवा अडथळे निर्माण होतात पण मारियामुळे हे अडथळे दूर होतील असा आशावाद मायक्रोसॉफ्टने व्यक्त केला आहे.

वाचा : आई आणि मुलीने एकाचवेळी दिला बाळांना जन्म