01 March 2021

News Flash

विमानाच्या कॉकपिटमध्येच सुरू झालं वैमानिक पती-पत्नीचं भांडण, प्रवाशांचे जीव टांगणीला

भांडण मिटल्यानंतर प्रवाशांचा जीव भांड्यात पडला

काही मिनिटांत या दोघांचं भांडण मिटलं, तेव्हा कुठे विमानातल्या प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

पती पत्नीमध्ये भांडणं व्हायला ना काळ असतो ना वेळ.. छोटासा वाद कधी पेट घेईल हे सांगता येत नाही, हा अनुभव प्रत्येक जोडप्यांना काही नवा नाही. पण, निदान चार चौघांसमोर आपली भांडणं येणार नाही याची काळजी घेण्याइतका प्रत्येकजण सुज्ञ जरूर असतो. पण, जेट एअरवेजच्या विमानात नुकताच वैमानिक पत्नी पत्नींच्या भांडणामुळे जो काही गोंधळ झाला त्यामुळे अक्षरश: विमानातल्या शेकडो प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.

त्याचं झालं असं की लंडनहून मुंबईला येण्यासाठी जेट एअरवेजचं विमान निघालं. विमान मुंबई विमानतळावर येण्यासाठी काही तासांच्या अवधी होता. इतक्यात कॉकपिटमध्ये असलेल्या वैमानिक आणि सहवैमानिकांमध्ये कडाक्याचं भांडण जुंपलं. हे दोघंही नवरा बायको असल्याचं समजत आहे. हे भांडण एवढं पेटलं की पतीनं पत्नीच्या कानशीलात लगावली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. भांडणामुळे हे दोघंही कॉकपीटमधून दोनदा बाहेर आले अशीही माहिती प्रवाशांनी दिली. त्यामुळे कॉकपिटमध्ये एकही वैमानिक नव्हता. त्यांचं हे भांडण पाहून ३२४ प्रवाशांचा जीव टांगणीला होता. या दोघांनी कॉकपीटच्या बाहेर येऊन नियम मोडला होता. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती.

काही मिनिटांत या दोघांचं भांडण मिटलं, तेव्हा कुठे विमानातल्या प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. या प्रकारणात जेट एअरवेजच्या या दोन्ही पती पत्नी वैमानिक आणि सहवैमानिकाचं निलंबन करण्यात आलं आहे. या दोघांमध्ये गैरसमजातून वाद झाल्याचं जेट एअरवेजनं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 1:24 pm

Web Title: mid air brawl of jet airways london mumbai flight pilot slaps co pilot
Next Stories
1 तुरूंगात थंडी वाजते, मग तबला वाजवा- न्यायाधीशांचा लालूंना सल्ला
2 Viral : कोट्यवधी किंमतीची जगातील सर्वात महागडी व्होडकाची बाटली चोरीला
3 व्हॉट्स अॅपचा अनोखा रेकॉर्ड, एकाच दिवशी पाठवण्यात आले ७,५०० कोटी शुभेच्छांचे मेसेज
Just Now!
X