20 October 2020

News Flash

VIDEO : आजीबाईंच्या या नृत्यासमोर बॉलिवूड अभिनेत्रीसुद्धा फिक्या पडतील

हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

छाया सौजन्य : सोशल मीडिया

सध्या ‘शेप ऑफ यू’, ‘डेस्पॅसिटो’ याच गाण्यांच्या व्हिडिओची क्रेझ तरुणाईमध्ये पाहायला मिळते. म्हणूनच या वर्षात युट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओच्या टॉप १० मध्ये त्यांचा समावेश आहे. पण आजीबाईंचा एक व्हिडिओ यांना जबरदस्त टक्कर देत आहे. जुन्या बॉलिवूड गाण्यावर नृत्य करतानाचा आजीबाईंचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

१९५६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परिवार’ या चित्रपटातील एका गाण्यावर त्यांनी ठेका धरला आहे. चेहऱ्यावरील सुंदर हावभाव पाहून त्यांचे कौतुक केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. मनसोक्त आनंद लुटत तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करता तेव्हा तुम्हाला सर्वोत्तम अनुभव मिळतो. या व्हिडिओतील आजीबाईंना पाहून तुम्हालाही हीच शिकवण मिळेल. त्यांच्या या नृत्यासमोर आजकालच्या बॉलिवूड अभिनेत्रीसुद्धा फिक्या पडतील असे म्हटल्यास हरकत नाही.

हा व्हिडिओ पाहून कित्येकांना त्यांच्या आजीची आठवण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यावर अनेकांनी भावूक प्रतिक्रियासुद्धा दिली आहे. सहा डिसेंबर रोजी एका फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. आतापर्यंत जवळपास ३५ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून एक लाख शेअर्स त्याला मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2017 5:39 pm

Web Title: millions are watching this elderly woman dance to an old hindi classic song
Next Stories
1 VIDEO : गावकऱ्यांनी पिल्लाला वाचवल्यानंतर हत्तीणीनं पाहा काय केलं
2 भारतातील पहिल्या महिला फोटो जर्नलिस्ट होमी व्यारवाला यांना डुडलची मानवंदना
3 विहीरीत दारू ओतल्याने अख्ख गाव टल्ली!
Just Now!
X