24 September 2020

News Flash

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांच्या इंग्रजीत चुका; नागपूर पोलिसांनी दिला भन्नाट सल्ला

ऑनलाइन चोरांची कामाची पद्धत पोलिसांची नजरेतून सुटलेली नाही

नागरिकांना फोन करुन किंवा मेसेजद्वारे केवायसी अपडेट करा किंवा तत्सम सल्ले देऊन ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळींचा पर्दाफाश करण्यात महाराष्ट्र पोलीस आघाडीवर आहेत. या चोरांची कामाची पद्धत आणि त्यात होणाऱ्या चुका हे पोलिसांच्या नजरेतून क्वचितच सुटेल. अशी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांना नागपूर पोलिसांनी भन्नाट ऑफर दिली आहे. या संदर्भात नागपूर पोलिसांनी केलेलं ट्विट सोशल मीडियातून व्हायरलं झालं आहे.

फसवणुकीच्या उद्देशानं नागरिकांना पाठवलेल्या या बनावट मेसेजमध्ये इंग्रजी लिखाणात अनेक चुका आढळून येतात. या चोरांची इंग्रजी भाषा कच्ची आहे, हे नागपूर पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून सुटलेले नाही. यासंदर्भात पोलिसांनी अशा चोरांनी पाठवलेल्या मेसेजना ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिल आहे. “तुमचं व्याकरणं खूपच कच्च आहे. त्यामुळे पोलीस विभाग तुम्हाला केवळ व्याकरणाचे धडेच देणार नाही तर विनामूल्य मुक्कामाची सोयही करेन….अर्थातच तुरुंगात.” अशा आशयाचं भन्नाट ट्विट नागपूर पोलिसांनी केलं आहे.

नागपूर पोलिसांनी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी लोकांना पाठवलेल्या बनावट मेसेजेसचे स्क्रीनशॉट्स आपल्या ट्विटच्या माध्यमातून शेअर केले आहेत. हे शेअर करताना पोलीस म्हणतात, घोटाळेबाजांनो तुम्हाला काही व्याकरणाचे धडे द्यायला आम्हाला आवडेल. हे सांगताना तीन वेगवेगळ्या प्रकारचे बनावट मेसेजचे स्क्रिनशॉट्स त्यांनी शेअर केले आहेत. या सर्व मेसेजमध्ये इंग्रजीच्या स्पेलिंगमध्ये चुका आहेत. त्याचबरोबर नागपूर पोलिसांनी या चोरांना आपला फोन नंबर देऊन यावर आम्हाला कॉल करा आमचं सायबर सेल तुमच्या दारापर्यंत येऊन तुम्हाला मदत करेन आणि लॉकअपमध्ये मोफत सेवाही पुरवेल, असं दमदार उत्तर दिलं आहे. नागपूर पोलिसांच्या या भन्नाट ट्विटला हजारो युजर्सनी लाईक केले असून अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तसेच पोलिसांच्या क्रिएटिव्हिटीला देखील दाद दिली आहे.

सर्वसाधारणपणे जे ऑनलाइन फसवणूक करणारे आहेत. ते जे मेसेज किंवा ई-मेल पाठवतात त्यांच्या इंग्रजी मजकुरामध्ये बऱ्याच चुका असतात. त्या जर नागरिकांनी ओळखल्या तर असे मेसेज हे खोटे मेसेज असल्याचे त्यांच्या सहजपणे लक्षात येऊ शकते. तसेच त्यामुळे अशा पद्धतीने आपण फसवणुकीपासूनही दूर राहू शकतो, असे आवाहनही नागपूर पोलिसांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 5:18 pm

Web Title: mistakes in the english language of online fraudsters disclosure advice given by nagpur police aau 85
Next Stories
1 मांजरीचं फिल्डींग स्किल पाहून सचिनही झाला अवाक, म्हणाला…ही तर जॉन्टी ऱ्होड्सलाही टक्कर देईल !
2 ट्रॅक्टरच्या मदतीनं त्यानं काढलं गाईचं दूध; हटके युक्तीच्या आनंद महिंद्राही पडले प्रेमात
3 ‘Binod’, सोशल मीडियावर करोनापेक्षा वेगानं पसरतोय; जाणून घ्या का आणि कसा सुरु झाला ट्रेंड?
Just Now!
X