25 November 2020

News Flash

मोदींपासून रेहमानपर्यंत अनेकांनी शेअर केलेला ‘या’ चार वर्षांच्या मुलीचा व्हिडीओ पाहिलात का?

पंतप्रधानांनाही हा व्हिडीओ शेअर करण्याचा मोह आवरला नाही

सध्या मिझोरममधील एक गोंडस मुलगी इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. सर्वसामान्य भारतीयांपासून ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच जण या मुलीच्या प्रेमात पडल्याचे चित्र सध्या इंटरनेटवर दिसत आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील आघाडीचे नाव असणाऱ्या ए. आर. रेहमान यांनाही या मुलीचे तोंड भरुन कौतुक केलं आहे. ही चिमुकली अवघ्या चार वर्षांची असून तिचं नाव आहे एस्तर हेंमटे असं आहे.

एस्तरचं वय लहान असलं तरी तिच्या युट्यूब चॅनलेच्या सबस्क्रायबर्सची संख्या पाहून ही मुलगी म्हणजे मुर्ती लहान पण किर्ती महान अशी आहे हे तुम्हाला लगेच समजेल. एस्तरच्या युट्यूब चॅनेलवर तब्बल एक लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असून दिवसोंदिवस ही संख्या वाढत आहे. बरं आता एस्तर चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे तिने गायलेलं वंदे मातरम् हे गाणं. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक बड्या व्यक्तींनी अगदी गोंडस पद्धतीने हे गाणं गाणाऱ्या एस्तरचं कौतुक केलं आहे.

मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वात आधी एस्तरचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये भारताचा राष्ट्रध्वज हातात पकडून ही चार वर्षांची एस्तर गाणं गाताना दिसत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही एस्तरच्या या गाण्याची भूरळ पडल्याचे पहायला मिळालं. मोदींनी ट्विटरवरुन या एस्तरचं कौतुक करत या व्हिडीओवर प्रितक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेला व्हिडीओ कोट करुन रिट्विट करत मोदींनी, “कौतुकास्पद आणि प्रशंसनिय! हे सादरीकरण पाहून एस्तर हेंमटेचा अभिमान वाटतो,” असं म्हटलं आहे.

वंदे मातरम हे मूळ गाणं सादर करणारा गायक, संगितकार आणि गितकार ए. आर रेहमाननेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. हे सादरीकरण म्हणजे प्रेम आणि गोंडसपणाचे उत्तम उदाहरण आहे असं रेहमानने म्हटलं आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज आणि पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनाही ट्विटरवरुन हा व्हिडीओ शेअर करताना एस्तरचं कौतुक केलं आहे.

या सेलिब्रिटींबरोबरच हजारो भारतीयांनी ट्विटर आणि सोशल नेटवर्किंगवरुन हा व्हिडिओ शेअर केला असून त्याला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज आहेत. तुम्हाला एस्तरचं हे गाणं कसं वाटलं कमेंट करुन नक्की सांगा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 9:23 am

Web Title: mizoram four year old esther hnamte wins over netizens pm modi with her cover of ar rahman maa tujhe salaam scsg 91
Next Stories
1 IPL 2020: उर्वरित वेळापत्रक जाहीर; ‘असे’ असतील सामने
2 डॉ. प्रेमानंद रामाणींचा जीवनप्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर; हा अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत
3 दसऱ्याच्या मुहूर्तावर छोट्या पडद्यावर उडणार ‘धुरळा’
Just Now!
X