28 September 2020

News Flash

नि:शब्द करणारा क्षण; करोनाग्रस्त बाळाबरोबर नर्सचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल

सर्वांनाच भावूक करणारा असा हा व्हिडीओ आहे.

सध्या देशात करोनानं थैमान घातलं आहे. दररोज करानोग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच सध्या देशभरात खबरदारीचा उपाय म्हणून २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी असतील किंवा वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स, सफाई कामगार हे सर्वच आपल्या सेवेसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता झटताना दिसत आहे. हे सर्वजण आपल्यासाठी देवदुतासारखे धावून येत आहेत. नुकताच एका सात महिन्यांच्या करोनाग्रस्त बाळाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मनसे अधिकृतवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

मनसेनं एका सात महिन्यांच्या बाळाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या बाळाला करोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. या बाळावर रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची योग्य ती काळजीही घेतली जात आहे. दरम्यान, या बाळासोबत खेळणाऱ्या एका परिचारिकेचा एक व्हिडीओ मनसे अधिकृत वरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्या परिचारिका त्या बाळासोबत खेळताना दिसत आहेत. त्याला गाणीही म्हणून दाखवत आहेत. त्यांच्यासोबत ते बाळही खुप चांगल्या पद्धतीनं खेळत आहेत. अशा प्रकारे सर्वांची काळजी घेणाऱ्यांना देवदुतचं म्हणावं लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 1:18 pm

Web Title: mns adhikrut shares 7 months old corona infected baby viral video medical staff playing with him jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 पंजाबमधून दिसू लागली २०० किमी अंतरावरील हिमाचलमधील हिमशिखरं?; सरकारी अधिकाऱ्याची पोस्ट चर्चेत
2 चला, जेवायची वेळ झाली ! जेव्हा विराट-पिटरसनच्या लाईव्ह चॅटमध्ये अनुष्काचा मेसेज येतो…
3 नोटांनी नाक आणि तोंड पुसणाऱ्याला पोलिसांनी केली अटक
Just Now!
X