News Flash

जाणून घ्या राज ठाकरे यांच्या होणाऱ्या सुनेबद्दल

मिताली बोरुडे ही फॅशन डिझायनर आहे

जाणून घ्या राज ठाकरे यांच्या होणाऱ्या सुनेबद्दल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे. अमित आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडे यांचा साखरपुडा सोहळा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला. (छाया सौजन्य : मिताली बोरूडे/फेसबुक)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे याचा साखरपुडा मिताली बोरुडे हिच्याशी महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला. अमित आणि मिताली यांची जुनी ओळख होती आणि याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. या सारखपुड्यामुळे एरवी राजकारणापासून काहीसा दूर राहणारा राज ठाकरे यांचा मुलगा अमित पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अम्पायरने बोट उंचावण्यापूर्वीच धोनीने मागितला रिव्ह्यू, आणि तो अचूकही ठरला…

Video : हा ठरला यूट्युबवर सर्वाधिक पाहिला गेलेला दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ

राज ठाकरे यांची होणारी सून नेमकी कशी आहे हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. राज यांची सून मिताली बोरुडे ही फॅशन डिझायनर आहे. अमितची बहिण उर्वशी सोबत तिनं ‘द रॅक’ हा फॅशन ब्रँड सुरू केला. ‘मिड डे डॉट कॉमच्या’ माहितीनुसार अमित आणि मिताली गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. मिताली बोरुडेने फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. एका सिनेमासाठीही तिने कपडे डिझाइन केले असल्याचं समजतं. मितालीचे वडिल डॉक्टर संजय बोरुडे हे प्रसिद्ध ‘बेरिएट्रिक सर्जन’ आहेत. अमित आणि मिताली पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 2:20 pm

Web Title: mns chief raj thackeray son amit thackeray engaged today with mitali borude krishna fashion designer from mumbai kunj in dadar info news in marathi
Next Stories
1 अम्पायरने बोट उंचावण्यापूर्वीच धोनीने मागितला रिव्ह्यू, आणि तो अचूकही ठरला…
2 जिद्दीला सलाम! एक पाय गमावलेला ‘हा’ वाहतूक पोलीस पुन्हा होणार सेवेत रूजू
3 ऐकावं ते नवलच! गाडी धीम्या गतीनं चालवली म्हणून महिलेकडून आकारला दंड
Just Now!
X