05 March 2021

News Flash

डोळ्यांवर गॉगल, हातात चहाचा कप, ‘स्पोर्ट्समन’ राज ठाकरेंचा टेनिस कोर्टमधला फोटो व्हायरल

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हा अंदाज आहेच खास

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं खेळावर असलेलं प्रेम अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेच. स्वतःला फिट ठेवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नियमितपणे टेनिस खेळत असल्याचं दिसून येतं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशात आता राज ठाकरेंचा आणखी एक डॅशिंग फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत राज ठाकरेंच्या डोळ्यांवर गॉगल हातात चहाचा कप दिसून येतो आहे. मनसे अधिकृतच्या फेसबुक पेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. तसंच मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनीही हा फोटो ट्विट केला आहे.

मनसेचे सचिव सचिन मोरे यांनीही त्यांच्या फेसबुक पेजवर राज ठाकरेंचा हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत त्यांनी शिवाजी पार्क दादर असंही लिहिलं आहे. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक मनसैनिकांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत राज ठाकरे निवांतपणे खुर्चीवर बसून चहा पिताना दिसत आहेत. त्यांचा हा लुक त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकजण सोशल मीडियावर त्यांच्या फिटनेस कौतुक करत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या खास भाषणशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते टेनिस खेळण्यासाठी जात आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांचाही टेनिस कोर्टमधला फोटो व्हायरल झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 9:55 pm

Web Title: mns leader raj thackeray dashing photo on tennis lawn viral again scj 81
Next Stories
1 रेल्वेच्या लोको पायलटनं वाचवले तीन हत्तींचे प्राण; पीयूष गोयल यांनी शेअर केला व्हिडीओ
2 दिवाळी बोनस आणि ऑफिसवरील भन्नाट मीम्स
3 नुसतं ‘चिकन’ हा शब्द ऐकून ६२ दिवसांपासून कोमात असलेला तरुण शुद्धीवर आला
Just Now!
X