वेनेजुअलाची प्रसिद्ध फिटनेस मॉडेल मिशेल लेविनसोबत एक घटना घडली आहे. आपल्या सोबत असे काही घडेल असा विचार तिने स्वप्नातही केला नसेल. मिशेल लेविन फोटोशूटसाठी पिग आयलँडवर गेली होती. पण हे फोटोशूट तिला महागात पडले आहे.

पिग आयलँडवर डुकरासोबत फोटोशूट करताना अतिशय विचित्र प्रसंग ३२ वर्षीय मॉडेलसोबत घडला आहे. फोटोशूट करताना डुकराने मिशेलचा चावा घेतला आहे. ३२ वर्षीय मॉडेलने या प्रसंगाचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

बहामासला जाणारा प्रत्येकजण पिग आयलँडला भेट देतो. या आयलँडवर लोक डुक्करासोबत फोटो आणि व्हिडीओ काढतात. मिशेल बिकनी परिधान करून डुकराच्या आजूबाजूला फोटोशूट काढत मस्ती करत होती. पण मिशेलला ही मस्ती महागत पडली आहे. बिकनीवर असणाऱ्या मिशेलला एका डुकराने चावा घेतला. त्यावेळी मिशेलने पळ काढला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.