News Flash

बंगालही गेलं… आता तरी टागोरांसारख्या दिसण्याचा नाद सोडून मोदी दाढी करतील का?

सोशल नेटवर्किंगवर व्यंगचित्रं, मिम्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस

प्रातिनिधिक फोटो

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता येणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे. मतमोजणीमध्ये तृणमूलने विजयी आघाडी मिळवली आहे. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत तृणमूल काँग्रेसने विजयासाठी आवश्यक असणारा बहुमताचा आकडा गाठलाय. तर भाजपाची घौडदौड १०० जागांच्या आतच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे. असं असतानाच ममता बॅनर्जींवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली जात आहे. करोना कालावधीमध्ये मोठ्याप्रमाणात प्रचारसभा घेऊनही भाजपाला पराभव पत्करावा लागत असल्याने मोदींसहीत अमित शाह आणि भाजपावर विरोधकांनी टीका करत ममतांचं कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लूकवरुनही आता टीका होऊ लागली आहे. बंगालमधील जनतेला मतदानासाठी संबोधित करताना मोदींनी रविंद्रनाथ टागोर यांच्यासारखा लूक ठेवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सोशल नेटवर्किंगवर सुरु होती. मात्र आता या लूकचाही मोदींना काही फायदा झाला नसून त्यांनी दाढी कापावी असा खोचक टोला विरोधकांनी ट्विटरवरुन लगावलेला दिसत आहे.

लोकप्रिय व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांनीही एका व्यंगचित्राच्या माध्यमातून अशाच पद्धतीची टीका केलीय. या व्यंगचित्रामध्ये टागोर मोदींना दाढी करण्यासाठी रेझर ब्लेड देताना दिसत आहेत. त्यावर मोदी केवळ, “गुरुदेव” असं म्हणताना दाखवण्यात आलं आहे.

सतीश यांचं हे व्यंगचित्र प्रचंड व्हायरल झालं असून चार तासांमध्ये तीन हजार ७०० हून अधिक जणांनी ते रिट्विट करुन शेअर केलं आहे. इतिहासकार आणि राजकीय क्षेत्रातील जाणकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामचंद्र गुहा यांनीही हे व्यंगचित्र ट्विट केलं आहे.

केवळ व्यंगचित्रच नाही तर अनेकांनी ट्विटरवरुन कमेंट्सच्या माध्यमातूनही मोदींनी आता तरी दाढी करावी आणि टागोंसारखा दिसण्याचा प्रयत्न सोडून द्यावा असा टोला लगावल्याचं पहायला मिळत आहे. आता तरी टागोरांसारख्या दिसण्याचा नाद सोडून मोदी दाढी करतील का?, असा प्रश्न अनेकांनी ट्विटरवरुन विचारला आहे. काहींनी मोदी आता नक्की दाढी करतील असंही म्हटलं आहे.

१) दो मई दाढ़ी गयी

२) मोदींना आता दाढी करता येईल

३) मोदी पंतप्रधान राहतील दाढीचं ठाऊक नाही

४) ममतांचा करिश्मा चालला…

५) पुढील काही दिवसांमध्ये…

६) बाल नरेंद्र होण्याची हीच वेळ

७) आता दाढी काढा आणि करोना परिस्थितीकडे बघा…

८) दाढी आता काढतील

९) मोदी दाढी तर ममता…

१०) सल्ला

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपाला सत्ता मिळवता आली नसली तरी आसाममध्ये भाजपाने सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये सत्तांतराची लाट बघायला मिळाली आहे. तामिळनाडूतील मतदारांनी द्रमुकच्या हाती सत्ता सोपवल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. द्रमुक १३९ जागी आघाडीवर आहे. तामिळनाडूत बहुमताचा आकडा ११८ इतका आहे. दुसरीकडे केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन नवा इतिहास नोंदवला आहे. विजयन यांना सलग दुसऱ्यांदा सत्तेची संधी मतदारांनी दिली आहे. विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ ९२ जागांवर आघाडीवर आहे. तर तिकडे पुदुचेरीत अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाही. पुदुचेरीत बहुमतासाठी १६ जागां आवश्यक असून, सायंकाळी सात वाजताच्या आकेडवारीनुसार भाजपा ९, तर काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2021 7:28 pm

Web Title: modi beard talk of social media since bjp lost bengal assembly election people says modi will trim beard in next few days scsg 91
Next Stories
1 Election Results: “बंगालमध्ये भाजपाचा कोब्रा भाजपालाच डसला वाटतं”; मिथुन चक्रवर्तींवरील Memes Viral
2 Assembly Election Results 2021: ‘त्या’ वक्तव्यामुळे प्रशांत किशोर भाजपा समर्थकांकडून ट्रोल
3 नायट्रोजनपासून ऑक्सिजन बनवण्याबद्दल भाष्य केल्याने योगी ट्रोल; लोक म्हणाले, ‘नावं बदलून बघा’
Just Now!
X