न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. वेलिंग्टन आणि ख्राईस्टचर्च या दोन्ही कसोटींमध्ये यजमान संघाने भारतीय संघाला चारीमुंड्या चीत केलं. फलंदाजांचं अपयश हे भारताच्या पराभवाचं प्रमुख कारणं मानलं जातंय. गोलंदाजांनी या मालिकेत आपल्यापरीने आश्वासक कामगिरी केली, मात्र फलंदाजांनी योग्य साथ न दिल्यामुळे भारताला पराभवाचं तोंड पहावं लागलं.
इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांनी या मालिकेत भेदक मारा केला. शमीने पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात महत्वाचे बळी घेतले. मात्र या पराभवानंतर शमीने आता स्वयंपाक घरात स्वतःचं मन रमवण्यास सुरुवात केली आहे. किचनमध्ये एक लज्जतदार पदार्थ तयार करतानाचा एक व्हिडीओ शमीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
Cooking is my passion & Cricket is my life #TeamIndia pic.twitter.com/JzxqbfoATc
— Mohammad Shami (@MdShami11) March 3, 2020
Cooking is my passion & Cricket is my life अशी कॅप्शन शमीने आपल्या व्हिडीओला दिला आहे. दरम्यान कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 3, 2020 3:50 pm