News Flash

‘हा’ अपंग बाॅयफ्रेंड आणि त्याच्या गर्लफ्रेंडविषयी आणखी थोडंसं…

या व्हायरल व्हिडिओपलीकडची कहाणी...

छाया सौजन्य- मिरर

अपंग व्यक्तींचं आयुष्य खडतर असतं हे आता नव्याने सांगायला नकोच. त्यातही एखाद्या अपघातानंतर आलेलं अपंगत्व मानसिकदृष्ट्या त्या व्यक्तीला आणखी त्रासदायक असतं. वयाची वीस पंचवीस वर्ष सगळ्यांसारखी काढल्यानंतर अचानक एखाद्या दिवशी आपलं पुढचं सगळं आयुष्य व्हीलचेअरवर बसून काढायचं आहे हे स्वीकारणं फार क्लेशदायक असतं

पण त्यातही अनेकजण जिद्दीने आपलं आयुष्य पुढे नेतात. बदललेल्या परिस्थितीत हार न मानता ही माणसं आपलं पुढचं आयुष्य यशस्वीपणे जगतात आणि त्यात त्यांना अनेक प्रिय व्यक्तींची मदतही मिळते.

खालचा व्हिडिओ एव्हाना पुरेसा व्हायरल झालाय. व्हीलचेअरवर बसलेला एक काॅलेजचा तरूण आणि त्याला त्याच्या ग्रॅज्युएशनच्या समारंभात मदत करणारी त्यांची मैत्रीण या दोघांचा हा खालचा व्हिडिओ जगभर लाखो लोकांनी पाहिलाय,

व्हिडिओ सौजन्य – फेसबुक

या व्हिडिओतला मुलगा म्हणजे ख्रिस नाॅर्टन आणि ही मुलगी म्हणजे त्याची गर्लफ्रेंड एमिली आहे. ख्रिस नाॅर्टनला जन्मजात कोणतंही अपंगत्व नव्हतं. तो काॅलेजच्या रग्बी टीममध्येही होता. पण एका मॅचदरम्यान त्याच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आणि त्याला चालता येईनासं झालं. अचानक घडलेल्या या अपघाताने ख्रिस साहजिकच हबकून गेला. पण त्याने त्यातूनही मार्ग शोधणं सुरू केलं. आपल्या बदललेल्या जीवनाविषयी विचार करत असताना मनात उठलेली वादळं त्याने ‘द पाॅवर आॅफ फेथ व्हेन द ट्रॅजिडी स्ट्राईक्स’ या पुस्तकात शब्दबध्द केली. आपलं शिक्षण सोडलं नाही. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून त्याने जगभर फिरत भाषण करायला सुरूवात केली. ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ म्हणून त्याची भाषणं एेकायला लोकांची गर्दी होऊ लागली.

आणि या सगळ्यात त्याला साथ लाभली एमिलीची

 

ख्रिस आणि त्याची गर्लफ्रेंड एमिली (छाया सौजन्य - फेसबुक) ख्रिस आणि त्याची गर्लफ्रेंड एमिली (छाया सौजन्य – फेसबुक)

 

त्याच्या ग्रॅज्युएशन समारंभाला त्याला जाता येणार नसल्याचं लक्षात येताच एमिलीने त्याच्यासोबत येण्याचा आग्रह धरला आणि वरच्या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्या जिवलगाला आपल्या हातांनी आधार देत तिने त्याच्या जीवनातला एक महत्त्वाचा क्षण त्याला अनुभवू दिला.

आणि या दोघांच्या कहाणीमधली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ख्रिस आणि एमिलीची ओळख ख्रिसला अपंगत्व आल्यानंतर झाली होती!

एकमेकांसोबत असताना दोघांचेही लकाकते डोळे पाहिले की या दोघांची ही बात सगळ्या..सगळ्या सीमांच्या आणि तथाकथित कल्पनांच्या पल्याड जाणारी आहे हे मनाच्या आतल्या कोपऱ्यापर्यंत भिडतं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2017 1:42 pm

Web Title: more about the viral video of the girl helping her handicapped boyfriend during his graduation ceremony
Next Stories
1 ‘रेल्वे केटरिंग घोटाळ्या’ची पोस्ट फेसबुकवर व्हायरल
2 हिटलरच्या टेलिफोनचा लिलाव, ६७ लाखांपासून बोलीला सुरुवात
3 Viral Video : ए भाऊ विमानतळ कुठे राहिलं?
Just Now!
X