व्हॉट्स अॅप या प्रसिद्ध मेसेजिंग अॅपच्या नावे नवा रेकॉर्ड तयार झाला आहे. या अॅपच्या माध्यमातून फक्त एका दिवसात ७ हजार ५०० कोटी शुभेच्छांचे मेसेज पाठवले गेले आहेत. एका मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून प्रचंड संख्येने मेसेज पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे एकाच दिवशी सर्वाधिक मेसेज पाठण्याचा विक्रम व्हॉट्स अॅपच्या नावे जमा झाला आहे.
भिन्न वर्षात जन्मले जुळे : एकाचा जन्म २०१७ मधला, तर दुसऱ्याचा २०१८
‘ती’ इमोजी हटवण्यासाठी व्हॉट्स अॅपला पाठवली नोटीस
विशेष म्हणजे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी व्हॉट्स अॅप काही काळासाठी बंद पडलं होतं. पण, तरीही जगभरातून सर्वाधिक शुभेच्छांचे मेसेज आणि फोटो या अॅपच्या माध्यमातून पाठवले गेले. दुसरी आश्चर्याची बाब म्हणजे अशी की ७ हजार ५०० कोटी शुभेच्छांच्या मेसेजमधून सर्वाधिक मेसेज हे भारतातून पाठवले गेले. कारण भारतात व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक आहे. टेक्स मेसेज सेवेसाठी पैसे मोजावे लागत असल्यानं अनेकांनी व्हॉट्स अॅपचा वापर करायला सुरूवात केली. गेल्यावर्षी नववर्षांच्या पहिल्या दिवशी व्हॉट्स अॅपवरून ६ हजार ३०० कोटी मेसेज पाठवले गेले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 5, 2018 10:29 am